Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात तळोदा तहसिल कार्यालयाला प्रथम तर तहसिल कार्यालय नवापूरला द्वितीय क्रमांक

team by team
April 18, 2022
in राज्य
0
नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

नंदुरबार l प्रतिनिधी
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोत्कृष्ट कल्पनातंर्गत शासकीय संस्था गटात तहसिल कार्यालय, तळोदा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना 50 हजार रुपये, सन्माचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. तळोदा तहसिल कार्यालयात त्यांनी उपलब्ध जागेचा पर्याप्त व सुनियोजितपणे वापर करुन तहसिल कार्यालयात वाहनतळ तयार करुन पार्किंगसाठी शिस्त लावली. तर याच गटात तहसील कार्यालय, नवापूर, जि. नंदुरबारने अभिलेख कक्षाचे नूतनीकरणाचा उपक्रम राबवीत 30 हजार रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. याबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी तळोदा आणि नवापूर तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2021-22 पासून राबविण्यात येते. या अभियानांतर्गत सहभाग घेवून सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये, अधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सूचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येते. ही स्पर्धा राज्यस्तरावर चार गटात घेण्यात आली होती. तसेच तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर हे अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. स्पर्धेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री पारितोषिक योजनेच्या धर्तीवर ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले होते.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोकृष्ट कल्पनाअंतर्गत शासकीय गटात तळोदा व नवापूर तहसिल कार्यालयाने केलेले काम उत्कृष्ठ असून त्यांनी बजावलेल्या या कामगिरीमुळे जिल्हृयातील इतर विभागातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना यातून निश्चित प्रेरणा मिळेल. पुढील वर्षी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानात अधिकाधिक पुरस्कार जिल्ह्यास मिळतील असा मला विश्वास आहे.
श्रीमती. मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे युवारंग १९ ते २३ एप्रिल दरम्यान रंगणार,महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Next Post

अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post
अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add