Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा पालिकेच्या दोन प्रभागांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, खा.डॉ.हीना गावितांच्या पाठपुराव्याला यश

team by team
March 31, 2022
in राजकीय
0
तळोदा पालिकेच्या दोन प्रभागांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, खा.डॉ.हीना गावितांच्या पाठपुराव्याला यश

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तळोदा पालिकेच्या प्रभाग क्र.१ व ३ मध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच विविध विकासकामे करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आता प्रभागाचे रुप बदलणार आहे.यामुळे प्रभागातील भाजपा नगरसेवकांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तळोदा पालिकेवर भाजपाची सत्ता आहे. सदर पालिकेतंर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेवक रामानंद शिरीषकुमार ठाकरे व प्रभाग क्रमांक तीनमधील नगरसेविका बेबीबाई हिरालाल पाडवी यांचे सुपूत्र दीपक पाडवी यांनी प्रभागाच्या विकासासाठी तसेच मुलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी खा.डॉ.हीना गावित यांच्याकडे केली होती.याबाबत खासदार डॉ.हीना गावित यांना निवेदनही देण्यात आले होते. खा.डॉग़ावित यांनी याची दखल घेत नगरविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. ना.एकनाथ शिंदे यांनीही याची दखल घेत तळोदा पालिकेतील प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्र.३ मध्ये मुलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे या प्रभागांमधील प्रताप नगर, श्रेयस कॉलनी, गोपाळ नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण व भूमिगत गटार तसेच अक्कलकुवा रोडवरील उत्तरेस आमराई फळी खर्डी नदीलगत संरक्षण भिंत बांधकाम करण्यात येणार आहेख़ा.डॉ.हीना गावित या गेल्या दीड ते दोन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत होत्या. निधी मंजूर झाल्याने प्रभागांमध्ये मुलभूत सोयीसुविधा निर्माण होणार असल्याने प्रभागातील रहिवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.निधी मंजूर केल्याने खा.डॉ.हीना गावित यांनी ना.एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.तर नगरसेवक रामानंद ठाकरे,नगरसेविका बेबीबाई पाडवी, दीपक पाडवी यांनीही खा.डॉ.हीना गावित यांचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा, तांदळामध्ये सिमेंट सदृश्य पदार्थ, गहू व विमल गुटख्याचे कागद

Next Post

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

Next Post
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add