Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोदलपाडा येथे याहा दिंडन गेर नृत्यात ५६० नृत्य कलाकारांनी केले नऊ चालींवर नृत्य सादर, हजारो नागरिकांची उपस्थिती

team by team
March 24, 2022
in राजकीय
0
मोदलपाडा येथे याहा दिंडन गेर नृत्यात ५६० नृत्य कलाकारांनी केले नऊ चालींवर नृत्य सादर, हजारो नागरिकांची उपस्थिती

नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ५६० नृत्य कलाकारांनी नऊ चालींवर नृत्य सादर केले.यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यात प्रामुख्याने होळी सणानिमित्त याहा दिंडन नृत्य करण्याची परंपरा आहे. याची सुरुवात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोजदान येथील कुवरसिंग तापसींग पाडवी यांनी १९५१-५२ मध्ये सुरुवात केली होती. आजपर्यंत ह्या नृत्याची परंपरा सुरू आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये होळीनिमित्त याहा दिंडन नृत्य सादर करण्याची परंपरा आहे. नृत्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांना होळीच्या नऊ दिवस पहिले प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर होळीच्या दिवशी सुट्टी देऊन पुढील आठ दिवस विविध गावांमध्ये हे नृत्य सादर केले जातं. होळी सणानिमित्त आदिवासी रुढी परंपरेने सुरू असलेल्या या नृत्य कलेला बघण्यासाठी नागरिक उत्सुक असतात. आज तळोदा तालुक्यातील मोदलपाडा या गावांमध्ये या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
या नृत्यात सहभागी होण्यासाठी पाच वर्षाच्या बालकांपासून प्रौढवयीन व्यक्तींना सहभाग घेता येतो. नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना ज्या गावात नृत्यू असेल त्याच ठिकाणी मुक्काम करावा लागतो. या काळात नृत्यात सहभागी झालेले व्यक्ती आंघोळ करत नाही. स्त्री सहवास टाळावा लागतो, केवळ स्वतःचे ओठ व डोळे ओले करू शकतात. पायात चप्पल न घालणे, पाणी न ओलांडणे आधी कडक नियम पाळावे लागतात. हे नृत्य सादर करण्यासाठी आज ५६० नृत्य कलाकार सहभागी झाले . यावर्षी 18 मार्च पासून परंपरेनुसार गेर दिंडन नृत्याला सुरुवात झाली असून आज तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे कार्यक्रम सादर करण्यात आला आणखी पुढे दोन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. त्यानंतर याची सांगता करण्यात येणार आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये होळीनिमित्त नृत्य सादर करण्याच्या या परंपरेला एक वेगळे महत्त्व आहे. यावेळी माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी.जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमाताई वळवी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि. प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, जि. प.रतन पाडवी, सभापती अजित नाईक,जि. प.सदस्य सुहास नाईक, सी.के.पाडवी, मधुकर नाईक,नगरसेवक गौरव वाणी, दीपक दिघे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. या अनोख्या नृत्याचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राजेश शहा यांचा राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने गौरव

Next Post

ठेकेदाराकडून ४ लाखाची लाच घेणाऱ्या त्या दोन अधिकाऱ्यांसह पंटरला २६ मार्च पर्यंत कोठडी, एसीबीकडून अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add