Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जी. टी. पाटील महाविद्यालयात संगीत व वाद-विवाद कौशल्य कार्यशाळा उत्साहात

team by team
March 23, 2022
in शैक्षणिक
0
जी. टी. पाटील महाविद्यालयात संगीत व वाद-विवाद कौशल्य कार्यशाळा उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व जी. टी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय “संगित कौशल्य व वादविवाद कौशल्य” कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

संगीत कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे समन्वयक माजी प्राचार्य डॉ. एम.एस. रघुवंशी तर वादविवाद कौशल्य कार्यशाळा उद्घाटन उपप्राचार्य डॉ.एम. जे. रघुवंशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस.श्रीवास्तव होते .
दोन दिवस चालणाऱ्या या दोन्ही कार्यशाळांमध्ये विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने ज्या वेगवेगळ्या कार्यशाळा महाविद्यालयांना दिल्यात त्यातील संगीत कौशल्य आणि वाद-विवाद कौशल्य हे दोन्ही कौशल्य विकसित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची या माध्यमातून जणू पूर्वतयारीच झाली असे उद्घाटन सत्राच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांनी आपले विचार मांडले. “संगीत कौशल्य “कार्यशाळेत संगीत शिक्षक हेमंत पाटील यांनी ‘संगीत आणि जीवन ‘या विषयाचे महत्व पटवून देताना संगीत कला आत्मसात करण्यासाठी हार्मोनियम ,बासरी आणि ढोलक वादनाच्या प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी त्यांना महेंद्र राजपूत ढोलक वादक म्हणून सहकार्य लाभले .तर दुसऱ्या सत्रात जी. टी. पाटील महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक ,आदिवासी लोककलेचे अभ्यासक डॉ. मनोज शेवाळे यांनी ‘आदिवासीचे लोकसंगीत व लोककला यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली .सोबत ज्योती महाराज बंधारपाडा, बकाराम चौरे ,व नथू जगताप यांच्याकडून पावरी वाद्य ,घोडा काठी , ढाक या वाद्यांची ओळख व प्रात्यक्षिके करून घेतली.
दुसऱ्या दिवशी ‘वादविवाद कौशल्य ‘कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पहिल्या सत्रात नंदुरबार येथील महिला महाविद्यालयातील ग्रंथपाल श्रीराम दाउतखाने यांनी वक्तृत्व कलेचा विकास ,भाषण कौशल्य या संदर्भात विचार मांडलेत तर दुसऱ्या सत्रात तळोदा महाविद्यालयातील प्रा.जयपाल सिंग शिंदे यांनी वक्तृत्व वादविवाद कलेसाठी आवश्यक असणारे साहित्यिक गुणांवर विस्तृत चर्चा केली .
या दोन्ही कार्यशाळांचे आयोजन विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत ,विद्यार्थी विकास अधिकारी व रासेयोचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम ,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.रुपेश देवरे ,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.जयश्री नायका यांनी केले होते.दोन्ही दिवस सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. माधव कदम यांनी केले तर आभार डॉ. रुपेश देवरे आणि प्रा.जयश्री नायका यांनी मानलेत. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. मनोज शेवाळे, हरीश पाटील, सागर साठे, राम ठाकूर ,नरेंद्र मोरे ,राहुल पवार ,राहुल सोनार ,योगेश पावरा, योगेश रतिलाल पावरा, सुमेध बर्डे , धनराज पवार, प्रथमेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवजयंतीनिमित्त मराठा गल्लीत अभिवादनासह ताक वाटप कार्यक्रम

Next Post

अक्कलकुवा पोलीसांच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने खापर सह कोराई गावकऱ्यांनी ठेवले गावबंद, पोलीस अधिकारी व गावकऱ्यांमध्ये झाली बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add