Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ. डॉ. विजयकुमार गावित यांची नुकसानग्रस्त घटनास्थळी भेट,शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

team by team
March 21, 2022
in क्राईम
0
आ. डॉ. विजयकुमार गावित यांची नुकसानग्रस्त घटनास्थळी भेट,शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील आखातवाडे शिवारात सुझलॉनच्या विद्युत तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटने गुरे बांधण्याच्या शेडला आग लागल्याने आगीत गाईचा होरपळून मृत्यू झाला असून बैल जखमी झाला होता. या सोबतच धान्यासह शेती उपयोगी असे सुमारे ६ लाख ७ हजार रुपयांचे साहित्य खाक झाल्याने काल आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार तालुक्यातील मांडळ येथील देविदास गोविंदा माळी यांचे आखातवाडे शिवारात शेत आहे. शेतातच त्यांनी गुरांना बांधण्यासाठी शेड उभारला आहे. दि.१९ मार्च रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास सुझलॉन कंपनीच्या विद्युत तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरांसाठी असलेल्या शेडला आग लागून पूर्ण शेड जळून खाक झाला. यामध्ये गहू, पत्रे, गीरगाय, औतसाहित्य, बोरींग पाईप कॉपर केबल, ताडपत्री, टब, रासायनिक खत, किटकनाशके, पाण्याच्या टाक्या,
दोरखंड, चारा, ठिबक सिंचनचे साहित्य किंमतीचा मुद्देमाल खाक झाला आहे. दरम्यान, एक बैल जखमी झाला आहे. दरम्यान, काल आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेतला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. डॉ. गावित यांनी आश्वासन दिले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी संबंधित सुझलॉन कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी अरुण रामराजे, भीमराव अहिरे, दीपक पाटील यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हाचे डॉ दिनेश बैसाणे यांना आदर्श क्रीडा पुरस्कार

Next Post

म्हसावद येथे 25 किलोमीटर सायकल मॅराथाॅनमध्ये दुर्गेश गिरासे प्रथम

Next Post
म्हसावद येथे 25 किलोमीटर सायकल मॅराथाॅनमध्ये दुर्गेश गिरासे प्रथम

म्हसावद येथे 25 किलोमीटर सायकल मॅराथाॅनमध्ये दुर्गेश गिरासे प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add