नंदुरबार l प्रतिनिधी
कोणत्याही कुटूंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळून येतो. अशावेळी ते कुटूंब मानसिकरित्या खचलेले असते. अशावेळी त्या कुटूंबाचे सांत्वन करुन त्यांना मानसिक आधार देणे हे प्रत्येक समाज बांधवांचे कर्तव्य आहे. नुसते मौतीत आणि गंधमुक्तीच्या कार्यक्रमास हजेरी लावून चालणार नाही, तर बाराही दिवस त्या कुटूंबाची प्रत्येक समाज बांधवाने आपापल्या वेळेत भेट देवून त्या कुटूंबास आधार द्यावा, असा ठराव अ.भा.बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष दिलीप बडगुजर यांनी बडगुजर समाजाच्या स्नेह मेळाव्यात समाजापुढे मांडला. त्यास समाज बांधवांनी एकमताने मंजुरी दिली.
नंदुरबार जिल्हा बडगुजर समाज उन्नती मंडळ व बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरपालिका शाळा क्र.१ येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजाची वार्षिक मिटींगसह पती-पत्नी, मुला-मुलींबरोबरच बालगोपालांसाठी खेळांचेही आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आई चामुंडा मातेच्या प्रतिमापुजनाने झाली. यानंतर बडगुजर समाजातील दिवंगत बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अ.भा.बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष दिलीप बडगुजर प्रास्ताविकेत म्हणाले की, जिल्ह्यात बडगुजर समाज संख्येने कमी असला तरी एकजुट आहे. समाजात कोणतेही गट-तट नसून बडगुजर समाज गुण्यागोविंदाने रहात आहे. समाजाची मला नेहमी साथ असून समाजाच्या आशीर्वादानेच माझी अ.भा.बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे, त्याबद्दल मी समाजाचा ऋणी आहे. तसेच यावेळी समाजात कुठल्याही घरी मौत झाल्यास दुखवट्याच्या बारा दिवसात प्रत्येक समाज बांधवांने आपापल्या वेळेनुसार त्या कुटूबास मानसिक आधार द्यावा, असा ठराव दिलीप बडगुजर यांनी समाजापुढे मांडला. त्यास समाज बांधवांनी सर्वानुमते मंजुरी दिली. यानंतर बडगुजर समाजासाठी देणगी देणारे काशिनाथ फकीरा बडगुजर, विजय संतोष बडगुजर, दिनेश श्यामराव बडगुजर, भरत बडगुजर, पाडुरंग तुकाराम बडगुजर, बन्सीलाल चवहण, राजेश रामचंद्र बडगुजर, कलाश्री महिला बचत गट यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संजय नागो बडगुजर, पंकज प्रभाकर बडगुजर यांचाही पदोन्नतीनिमित्त यथोचित सत्कार झाला. यानंतर पती-पत्नी, मुला-मुलींबरोबरच बालगोपालांसाठी विविध खेळ झाले. यात लहान गटात (लिंबू चमचा) प्रथम-मंथन प्रकाश बडगुजर, द्वितीय-क्रिष्णा कैलास बडगुजर, तृतीय हिमांशु किशोर बडगुजर, उत्तेजनार्थ-सिद्धी रविंद्र बडगुजर, मोठा गट (तोंडात टॉमेटो घेवून पळणे)-प्रथम-सर्वेश दिलीप बडगुजर, द्वितीय-आकाश राजेश बडगुजर, तृतीय-काल संजय चव्हाण, उत्तेजनार्थ निल महेंद्र बडगुजर, महिला गट (फुगे फुगवून फोडणे)-प्रथम-सुनिता राजेश बडगुजर, द्वितीय-पुजा गिरीष बडगुजर, तृतीय स्वाती मिलिंद बडगुजर, उत्तेजनार्थ गायत्री रविंद्र बडगुजर हे विजयी झाले. त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर यांनी केले. तर आभार सचिव अश्विन बडगुजर यांनी मानले. शेवटी स्नेहभोजनाची कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सल्लागार पंडीत बडगुजर, भाईदास बडगुजर, देविदास बडगुजर, दिनेश बडगुजर, भरत बडगुजर, गणेश बडगुजर, प्रकाश बडगुजर, विलास बडगुजर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता बडगुजर, पौर्णिमा बडगुजर, प्रिती बडगुजर, रेणुका बडगुजर, अनिता बडगुजर, पुनम बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.