Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दरोड्याचे गुन्ह्यातील 11 वर्षांपासुन फरार संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने निजामपुर येथून ठोकल्या बेड्या

team by team
March 17, 2022
in क्राईम
0
दरोड्याचे गुन्ह्यातील 11 वर्षांपासुन फरार संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने निजामपुर येथून ठोकल्या बेड्या

नंदूरबार l प्रतिनिधी
दरोड्याचे गुन्ह्यातील 11 वर्षांपासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने निजामपुर येथून बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक बी . जी . शेखर पाटील यांनी नाशिक परीक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हा घडलेपासून आज पर्यंत गुन्ह्यात फरार , पाहिजे किंवा फेर अटक आरोपीतांना अटक करणेबाबत संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दि. 3 मार्च 2022 रोजी पासुन फरार , पाहिजे व फेर अटक आरोपी अटक करण्याबाबत विशेष मोहीम राबविणेबाबत आदेशीत केले होते . त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांचे स्वतंत्र पथक स्थापन करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील जास्तीत जास्त फरार , पाहीजे आरोपी व फेर अटक आरोपी अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या . सन 2011 मध्ये नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत उमज गावाचे शिवारात फिर्यादी केरसन धेड्या नाईक यांच्या शेतातील घरावर अज्ञात 10 ते 12 लोकांनी फिर्यादी केरसन नाईक यांना मारहाण करुन दरोडा टाकुन कपाटातील 23 हजार रुपये रोख व 2 मोबाईल असा ऐवज जबरीने चोरुन नेल्यावरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम 395 397 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यावेळी सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास लावुन 2 आरोपी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला होता . तसेच सदर गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपी हे अटक झालेले नसल्याने गुन्हा घडल्यापासुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील पाहिजे , फरार व फेर अटक पाहिजे यादीमध्ये समाविष्ट होते . दि. 14 मार्च 2022 रोजी सदर गुन्ह्यातील पाहीजे आरोपी सरेशलाल उर्फ शेरीलाल पेरुलाल भोसले हा निजामपुर येथे येणार असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती .पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदर बातमीची खात्री करुन पाहीजे आरोपी अटक करण्यकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ निजामपुर येथे रवाना केले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने निजामपुर गाठून तेथे सरेशलाल उर्फ शेरीलाल पेरुलाल भोसले याचा शोध घेण्यास सुरुवात केली . परंतु सदर आरोपी हा अत्यंत चालाख असुन पोलीसांना वेळोवेळी गुंगारा देत आला आहे . तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तीत्व लपवून वेषांतर करुन फिरतो त्यामुळे त्यास ओळखणे देखील कठीण होते . नमुद आरोपी हा एका गॅरेजवर असल्याचे पथकास निदर्शनास आल्याने पथकाने गॅरेजचे बाहेर सापळा लावला . आरोपी गॅरेजचे बाहेर येत असतांना त्यास पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला . परंतु पथकाने लावलेला सापळा मजबुत असल्याने त्यास पळुन जाता आले नाही व तो सापळ्यात अडकला . त्यास पथकाने ताब्यात घेऊन पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात हजर केले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार सजन वाघ , प्रमोद सोनवणे , मुकेश तावडे , पोना विशाल नागरे यांचे पथकाने केली . 11 वर्षांपासुन पाहीजे असलेल्या दरोड्याचे गुन्ह्यातील आरोपीस गुप्त बातमीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने निजामपुर येथे सापळा लावुन अटक केल्याने पोलीस अधीक्षक , पी . आर . पाटील यांनी संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे . तसेच पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात फरार व पाहीजे आरोपी पकडण्याच्या विशेष मोहीमेत स्थानिक गुन्हे शाखा , नंदुरबार यांनी एकूण 20 आरोपींना नंदुरबार जिल्ह्यातुन तसेच शिरपुर , मालेगाव येथुन ताब्यात घेऊन गुन्ह्याचे तपासकामी संबंधीत पोलीस ठाण्यात हजर केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

विखरण येथील दोन शेतकऱ्यांचा ऐन तोडणीवर आलेला चार एकर ऊस जळून खाक, नैराश्यापोटी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न;परिसरात आठवड्यातील दुसरी घटना

Next Post

दुःखद घटनेप्रसंगी मानसिक आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य,दुखवटाच्या बारा दिवसात प्रत्येक समाज बांधवांची हजेरी लावण्याचा ठराव मंजूर

Next Post
दुःखद घटनेप्रसंगी मानसिक आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य,दुखवटाच्या बारा दिवसात प्रत्येक समाज बांधवांची हजेरी लावण्याचा ठराव मंजूर

दुःखद घटनेप्रसंगी मानसिक आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य,दुखवटाच्या बारा दिवसात प्रत्येक समाज बांधवांची हजेरी लावण्याचा ठराव मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add