Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विखरण येथील दोन शेतकऱ्यांचा ऐन तोडणीवर आलेला चार एकर ऊस जळून खाक, नैराश्यापोटी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न;परिसरात आठवड्यातील दुसरी घटना

team by team
March 17, 2022
in कृषी
0
विखरण येथील दोन शेतकऱ्यांचा ऐन तोडणीवर आलेला चार एकर ऊस जळून खाक, नैराश्यापोटी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न;परिसरात आठवड्यातील दुसरी घटना

नंदुरबार । प्रतिनिधी
महावितरण कंपनीचा गलथान कारभारामुळे नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील दोन शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शेतशिवारात गेलेल्या महावितरणच्या तारांमध्ये घसरण होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने दोन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर जळून राख रांगोळी झाल्याने विखरण येथील हताश झाले. एक शेतकरी आग विझवित असतांना त्यांचा हात जळाला असून गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विखरण येथील शेतकरी रतिलाल बापू पाटील (वय 55) व सुनिल जगन्नाथ पाटील (वय 60) या दोन शेतकऱ्यांनी बिकट परिस्थितीत सव्हे क्र. 14 /7 मध्ये उसाची लागवड केली होती. मात्र ऐन तोडणीवर आलेला ऊस शॉर्टसर्किटमुळे आग लागुन नुकसान झाले आहे. लागलेल्या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचा मिळून ३ ते ४ एकर ऊस जळून राख झाला आहे. आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केल्याने आग विझविण्यासाठी गेलेले शेतकरी रतिलाल पाटील यांचा हात देखील या आगीत जळाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. आग लागल्याची घटना माहिती होताच विखरणसह परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आहे. यावेळी मिळेल त्या साधनांनी शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे. यामुळे परिसरातील 30 एकर क्षेत्रात असलेला ऊस आगीपासून वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. मात्र ही घटना रात्रीची झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती असे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. विखरण परिसरात ही दुसरी घटना असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. वीज वितरणच्या तारांमुळे झालेल्या आगीची माहिती संबंधित खोंडामळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता श्रीमती साळुंखे यांना देण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच साळुंके यांनी घटनास्थळी येवून भेट दिली आहे. याबाबत मात्र पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. संबंधित विद्युत वितरण कंपनीने दोन्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे , अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा परिसरातील शेतकरी व सुनील पाटील आणि रतिलाल पाटील यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीसह निघणार सवाद्य मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गठीत

Next Post

दरोड्याचे गुन्ह्यातील 11 वर्षांपासुन फरार संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने निजामपुर येथून ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add