Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीसह निघणार सवाद्य मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गठीत

team by team
March 17, 2022
in राजकीय
0
नंदुरबारात शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीसह निघणार सवाद्य मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गठीत

नंदुरबार l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात बैठकीत एकमताने चर्चा करण्यात आली. 20 मार्च रोजी पूर्वसंध्येला मोटर सायकल रॅली तर 21 मार्च रोजी छत्रपती शिवरायांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत नंदुरबार शहरातील विविध व्यायाम शाळा व शिवप्रेमी मंडळ सहभागी होणार आहेत.
नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर व्यायाम शाळा व शिवप्रेमींची बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यावर चर्चा होऊन सर्वानुमते शिवजयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली. तसेच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 20 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता नंदुरबार शहरातील ग्यारा मिल कंपाऊंडपासून मोटारसायकल रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली संभाजीनगर व्यायामशाळा, सिंधी कॉलनी, मोदी ग्राउंड, करण चौफुली, गिरीविहार गेट, उड्डाणपूल मार्गे गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायामशाळा, सोनार खुंट, जळका बाजार, दादा गणपती, मोठा मारुती मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात समारोप होईल. तसेच दिनांक 21 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त सायंकाळी चार वाजता सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक माळीवाडा येथून निघणार असून महाराष्ट्र बँक शाळा सोनार खुंट, जळका बाजार, दादा गणपती, मोठा मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दीनदयाळ चौक मार्गे जुनी नगरपालिका चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून समारोप होईल. या शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली असून समितीत केतन रघुवंशी, पंडित माळी, अर्जुन सुधाकर मराठे, संजय रगडे, नरेंद्र पाटील, वीरेंद्र अहिरे, सागर चौधरी, कुणाल सोनार, भुषण पाटील, युवराज राजपूत, खुशाल चौधरी यांचा समावेश आहे. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्यासह शहरातील विविध व्यायामशाळेचे अध्यक्ष, संघटनांचे प्रमुख व शिवप्रेमी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बाबा गरीबदास समाधी साहेब मंदिरात वार्षिक मेला उत्सवानिमित्त मा.आमदार शिरीष चौधरी यांनी घेतले दर्शन

Next Post

विखरण येथील दोन शेतकऱ्यांचा ऐन तोडणीवर आलेला चार एकर ऊस जळून खाक, नैराश्यापोटी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न;परिसरात आठवड्यातील दुसरी घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add