नंदूरबार l प्रतिनिधी
बाबा गरीबदास समाधी साहेब मंदिरात वार्षिक मेला उत्सवानिमित्त सिंधी कॉलनी परिसरातील बाबा गरीबदास यांच्या समाधिस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मा.आमदार शिरीष चौधरी यांनी दर्शन करून आशीर्वाद प्राप्त केले.
बाबा गरीबदास समाधी साहेब मंदिरात वार्षिक मेला उत्सवानिमित्त काल मा.आमदार शिरीष चौधरी यांनी दर्शन करून आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी पूज्य अपरसिंध पंचायत व समाधी सेवा मंडळ तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी त्यांचे सहकारी नगरसेवक चारुदत्त कळवणकर ,आकाश चौधरी प्रशांत चौधरी, कमल ठाकुर ,रामनभाई दुसेजा, राम नाथानी, दिलीप बालानी आदी उपस्थित होते.