Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व. विठ्ठल हिरणवाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मीडिया व्याख्यानमाला वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज – डॉ. सोमनाथ वडनेरे

Mahesh Patil by Mahesh Patil
July 28, 2021
in सामाजिक
0
स्व. विठ्ठल हिरणवाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मीडिया व्याख्यानमाला वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज – डॉ. सोमनाथ वडनेरे

नंदुरबार  | प्रतिनिधी-

समाजात आज सर्वत्र नकारात्मकता वाढीस लागली असतांना वृत्तांकन करतांना एका समुपदेशकाची भूमिका निभविणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या वर्तमानपत्रांनी भविष्यपत्रे बनून  समाजमन सशक्त बनविण्यासाठी तसेच भविष्यातील सुदृढ, निरोगी, निर्भय, व्यसनमुक्त आणि मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी वृत्तांकन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी केले.
स्व.विठ्ठल हिरणवाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मीडिया व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पुष्प गुंफतांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज या विषयावर व्याख्यान दिले. ते पुढे म्हणाले की, लोकशाहीचा मजबूत स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांनी एक जागरुक घटक म्हणून नेहमी चांगले कार्य केले आहे. सध्याच्या अनिश्चतेच्या काळात मानवीमन नकारात्मक बाजूने जास्त झुकत चालले आहे. अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांनी समुपदेशकाची भूमिका करण्याची आवश्यकता आहे. लोकांना वस्तुस्थितीची माहिती देत असतांना भयभीत न करता निर्भयतेचा आणि आश्वासक असे संतुलित वृत्तांकन करुन भविष्यातील सुदृढ समाज घडविण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे.
नारदाबरोबर संजयची भूमिका करावी
नारदास आद्य पत्रकार मानतात. तीन्ही लोकांची त्यांना माहिती असे. मात्र आता वृत्तपत्रांनी संजयचीही भूमिका करावी. भविष्यातील मानवी समाजावर येणाया संकटांचा, परिस्थितीचा अंदाज घेऊन निराशा, भय, चिंतेच्या गर्तेतून समाजास बाहेर काढण्याकरीता वृत्तांकनातून व्हावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयचंदनगर येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीडिया प्रभागाचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांनी केले.उपस्थितांचे स्वागत बी.के. विजयादीदी यांनी केले.अध्यक्षीय संबोधन  बी.के. विद्यादीदी शहादा यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन बी.के. योगीता बहन यांनी केले. कार्यक्रमास  बी.के. कल्पनादीदी समवेत अनेकांचे सहकार्य लाभले.  कोवीडच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाचे प्रसारण आले. त्याचा लाभ अनेक माध्यम प्रतिनिधी

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ अपघात प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : सामाजिक कार्यकर्ते इंजी.दिग्विजयसिंग राजपूत यांनी पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली आहे

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group