नंदूरबार l प्रतिनिधी
डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने लाववेल्या एक्झिट एक्झाम टेस्ट विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि खा. डॉ. हिना गावीत यांच्यामार्फत राष्ट्रपतींना तक्रारी निवेदन पाठवण्यात आले आहे. याबाबत देशव्यापी आंदोलनाचा इशारा शुभम डव्हळे आणि संघटनांनी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की ,फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत दिलेला अभिप्राय अतिशय चुकीच्या पद्धतीने, डिप्लोमा इन फार्मसी च्या विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता. चालू शैक्षणिक वर्षात लादण्याचा प्रकार केला आहे. वास्तविक पाहता हा निर्णय बी फार्मसी, व डॉक्टर यांना लागू करायला पाहिजे होता. परंतु डिप्लोमा इन फार्मसी अशा मोजका अभ्यासक्रम असणाऱ्या कोर्सला एक्झिट एक्झामिनेशन लावणे निव्वळ मूर्खपणा असल्याचे लक्षणें आहेत. त्यामुळे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया ही प्रतिष्ठित संस्था असून, अशा संस्थांकडून ही चूक होणे अपेक्षित नाही.फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांनी डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन विनिमय तात्काळ रद्द करावे. तसेच परीक्षा पॅटर्न चेंज करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक, शैक्षणिक, मानसिक, नुकसान होणार असून या निर्णयाविरोधात डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात दिसून येत आहेत. डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणारच आहे. परंतु त्यांनी दोन वर्ष डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमात लावलेला आपला अमुलाग्र वेळ, फोर्स ला लागलेली फी अशा प्रकारे विद्यार्थ्याचे आर्थिक, शैक्षणिक, मानसिक नुकसान निश्चितच होणार आहे. म्हणून विद्यार्थी विरोधी अशा जाचक एक्झिट एक्झामिनेशन निर्णयाला तात्काळ रद्द करण्याची मागणी करत आहेत.
निवेदनावर डी फार्मसीचे विध्यार्थी शुभम डव्हळे, शालिनी सोनवणे, मानव पाटील, मिलिंद अहिरे, भावेश बोरसे, कुशल शिंदे, तेजल चौधरी, आरती पवार, मनोज बोरसे, अर्पिता देसाई, यश पाटील, कृपाल राजपूत, शुभम पाटील, व आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.