Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठी सात हजारांची मागणी करणाऱ्या आदिवासी विकास प्रकल्पाचा लाचखोर कनिष्ठ लिपीकास रंगेहाथ अटक: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

team by team
February 22, 2022
in क्राईम
0
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पाचे कनिष्ठ लिपीक 5 हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचखोर लिपीक किशोर भरतसिंग पावरा यास रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार तळोदा येथील महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत असून ते आदिवासी समाजाचे असून त्यांना शासनाने विनामुल्य शासकीय होस्टेल तळोदा येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तक्रारदार व त्यांचे मित्रांनी तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात होस्टेलला प्रवेश मिळविण्याकरीता ऑक्टोंबर 2021 ला ऑनलाईन फॉर्म भरले होते. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये हॉस्टेल मध्ये प्रवेश संबंधिची लिस्ट लागली होती. त्यात तक्रारदार व त्यांच्या मित्राचे नाव नव्हते. त्यानंतर दि.17 फेबु्रवारी रोजी सायंकाळी तक्रारदार यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयातील लिपीक पावरा यांचा फोन तक्रारदार यांना आला व पैश्‍यांची मागणी केली असता आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे लिपीक किशोर पावरा यांनी पंचसाक्षीदारांसमोर 7 हजार रूपये लाचेची मागणी केली मात्र तडजोडीअंती 5 हजार रूपयांची रक्कम तळोदा येथील जय अंबे नाश्‍ता कॉर्नर व भोजनालयाच्या बाजुस असलेल्या मीरा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पंचसाक्षीदारांसमोर लाच स्विकारतांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी वाघ, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, उत्तम महाजन, विलास पाटील, विजय ठाकरे, संजय गुमाने, अमोल मराठे, चित्ते, देवराम गावीत, ज्योती पाटील, महाले आदींच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add