तळोदा | १४ प्रतिनिधी
कोरोना संकट काळातील कोरोना योद्धा डॉक्टर आणि परिचारिका यांची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांनी केले.तळोदा येथे कोरोना योद्धा डॉक्टर आणि परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाशी लढा देताना आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणार्या नंदुरबार येथील स्मित हॉस्पिटल येथील व तळोदा शहराचे सुपुत्र डॉ. रोशन भंडारी, डॉ.गौरव तांबोळी, तसेच डॉ.स्वप्नील महाजन, डॉ.रोहित पटेल, निलेश तवर आदींचा सत्कार नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी व ज्यांनी ही संकल्पना सुचविली ते तळोदा येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गौतम जैन, युवा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऍड.राम रघुवंशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, या जागतिक महामरीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी या डॉक्टरांनी घेतली. रुग्ण कुठलाही असो त्याच्या जीव वाचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. यावेळी तळोदा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी किर्तीकुमार शहा,शांतीलाल जैन,चंपालाल जैन,दिलीप जैन, नरेंद्र जैन,हंसकुमार जैन,दिनेश जैन,चंद्रकांत जैन, डॉ.संदीप जैन, ऍड. अल्पेश जैन, गुड्डू जैन, राहुल जैन, रवी जोहरी व इतर तळोदा शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी हे यावेळी उपस्थित होते.