तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मालदा व धजापाणी येथे जि.प.अध्यक्षांच्या हस्ते हातपंपाचे भूमिपूजन करण्यात आले.
तळोदा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मालदा अंतर्गत येणार्या मालदा व धजापाणी येथे आदिवासी उपयोजनेतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी विंधन हातपंपाचे जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी व माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच करुणा पावरा, गोपी पावरा, पोलीस पाटील सखाराम ठाकरे, ग्रा.पं.सदस्य बेताब पावरा, उपसरपंच मगन ठाकरे, आंबुलाल वळवी, विजय मावची, हरिष खर्डे, सचिन राहसे, विशाल वळवी, संजय खर्डे, युवराज वळवी, कांतीलाल वळवी, करण वळवी, शंकर ठाकरे, गोविंद खर्डे, तेट्या पावरा, गोरख पाडवी, तिरसिंग पवार, बिंद्रा खर्डे, राजू वळवी, मंगल मावची, अशोक वळवी आदी उपस्थित होते.