नंदुरबार | प्रतिनिधी
येथील जन शिक्षण संस्थानतर्फे लॉकडॉऊन काळात निर्मित मास्कचे नगर पालिका सफाई कामगारांना वाटप करण्यात आले.
जन शिक्षण संस्थान नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेले ५०० मास्क चेअरमन केदारनाथ कवडीवाले, व्हा.चेअरमन गिरिष बडगुजर, प्रा.सरदार पावरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभागाचे समन्वयक व सेवा फाऊंडेशन पुणेचे सचिव भारत भुषण उपस्थित होते. संचालक बाबुलाल माळी यांनी मास्क वितरण उपक्रम व जन शिक्षण संस्थान नंदुरबारचा उद्देश तथा जिल्हयात सुरु असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. व्हा.चेअरमन गिरिष बडगुजर यांनी सफाई कामगारांचे अभिनंदन व स्वागत केले.
यावेळी तीन मास्कचा एक संच याप्रमाणे प्रत्येकाला वाटप करण्यात आले. सेवा फाऊंडेशन करित असलेल्या कामाची माहिती घेतली व पुढील काळात जनशिक्षण संस्थानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी लेखाधिकारी शरद जोशी, साधन व्यक्ती सौ.अनुराधा मोरे, कॉम्प्युटर ऑपरेटर कल्पेश जाधव, सहाय्यक राहुल चव्हाण यांनी सहकार्य केले.