नंदुरबार | प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. १८ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पिंपळनेरहून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.
सोमवार दि.१९ जुलै १ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत रुग्णवाहिका व शववाहिकांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी १२.१० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे कुपोषणाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी १ वाजता नंदुरबार येथे खावटी कीट वाटप कार्यक्रम. दुपारी ३ वाजता नंदुरबार येथून तळोदाकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता तळोदा येथे खावटी कीट वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५.३० वाजता तळोदा येथून असली ता.धडगावकडे प्रयाण व मुक्काम. मंगळवार दि.२० जुलै व बुधवार २१ जुलै रोजी असली ता.धडगाव येथे राखीव मुक्काम.