नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस.ए. मिशन इंग्रजी मिडीयम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे . यावर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे .
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला . या परीक्षेत नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्रजी मिडीयम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे . शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक प्राची गुलाब राठोड हिने (९८.६० टक्के ), द्वितीय क्रमांक वैभवी प्रशांत शहा हिने (९८.४० टक्के), तृतीय क्रमांक दुर्गेश विजय लोखंडे याने (९८.२० टक्के) , चतुर्थ क्रमांक विधी प्रशांत पटेल हिने (९७.२० टक्के) तर संकेत सुधाकर शिंपी याने ( ९६.६० टक्के) गुण मिळवुन पाचवा क्रमांक मिळविला आहे . शाळेतील १७ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहे . या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन जे.एच.पठारे , कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी , प्राचार्य डॉ . नुतनवर्षा वळवी , मुख्याध्यापिका डॉ. सुनिता अहिरे, पर्यवेक्षक सबस्टिन जयकर आदींनी कौतुक केले.