नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या मार्गदर्षणाखाली जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालविणान्यांविरोधात विशेष मोहिम राबविन्यात येत आहे.त्याअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून 53 वाहन चालकांचे लायसन्स 6 महिनेसाठी निलंबीत करण्यात आले आहेत .
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणान्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्यमध्ये झालेली वाढ लक्षात घेता पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द वेळोवेळी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते . सदर मोहीम सात्यत्याने सुरु असून त्यात अधिक तिव्रता आणण्यात आली आहे . नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळून आले . त्यामुळे त्यांचे विरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून अशा वाहन चालकाचा वाहन चालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सुरु करण्यात आली होती . त्यात आता नंदुरबार शहर वाहतूक शाखा 28 , नंदुरबार शहर 8 , उपनगर – 4 , विसरवाडी 1 , नवापुर 2 , सारंगखेडा – 2 , धडगाव- 5 , अक्कलकुवा 2 , तळोदा 1 असे 53 वाहन चालकांचे लायसन्स 6 महिनेसाठी निलंबीत करण्यात आले आहेत . आतापावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या कडून एकुण 107 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्यात आले आहेत . भविष्यात ही मोहीम आणखी तीव्रतेने राबविली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी इशारा दिला आहे.








