Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोयाबिन पिकावरील किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

team by team
July 16, 2021
in कृषी
0
नंदुरबार | प्रतिनिधी
  जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पाऊस झाल्यानंतर सोयाबिन पिकावर खोडमाशीच्या प्रादुर्भावास सुरूवात झाली असल्याने शेतकर्‍यांना सोयाबिन पीकावरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
जुलै महिन्याचा दुसर्‍या आठवड्यात सोयाबिन पेरणी केलेल्या पिकांवरदेखील पुढील काही दिवसात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. खोडमाशीच्या प्रादुर्भावाने सोयाबिन उत्पादनात १६-३० टक्के घट होते. तर चक्रीभुगांच्या प्रादुर्भावामुळे देखील उत्पादनावर होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी सोयाबिन पीकावर खोंडमाशी व चक्रीभुंगाच्या व्यवस्थापनाकरिता शेतात पिवळे चिकट सापळे लावावे.
 खोडमाशी व चक्रिभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने व फांद्याचा किडीसह नायनाट करावा. खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर (सरासरी १० टक्के किडग्रस्त) या दोन्ही किडीचे नियंत्रणासाठी इथेनॉल ५० टक्के- ३० मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के-६-७ मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा थायोमेथोक्झाम १२.६ टक्के अधिक लँब्डा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के झेडसी २.५० मिली यापैकी कोणतेही एका किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

क.पु.पा.माध्यमिक व कनिष्ठ महाविदयालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने शक्षक- पालक सहविचार सभा उत्साहात

Next Post

बैलांची सुटका करणार्‍या पोलीस पथकाशी धक्काबुक्की ,१० जणांविरुध्द गुन्हा, ७ जणांना अटक

Next Post

बैलांची सुटका करणार्‍या पोलीस पथकाशी धक्काबुक्की ,१० जणांविरुध्द गुन्हा, ७ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add