नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पु.पा.माध्यमिक व कनिष्ठ महाविदयालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता ८वी ते१२वी चे वर्ग सुरु करण्याबाबत शिक्षक- पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी नाना आत्माराम पाटील यांच्या अध्यक्षतेत ही सभा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून भालेर केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख वसंत पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतातून कोविड १९ च्या नियमांचे पालन करून जीआर चा संदर्भ देऊन इयत्ता८ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यास काही हरकत नाही. तसेच डॉ. राकेश पाटील यांनी आरोग्य, स्वच्छता, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर कसे ठेवावे याबाबत माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्या सौ. कविता चंद्रशेखर पाटील व सौ. शोभा प्रल्हाद पाटील उपस्थित होत्या.याप्रसंगी गावातील मान्यवर आनंदा कैलास पाटील, नाना चव्हाण, त्र्यंबक पुंडलिक पाटील, शामराव आत्माराम पाटील ,प्रकाश मिस्तरी, सुनिता मिस्तरी भारती पवार ,मूलकण चीलू भिल तसेच भालेर, नगाव, तीसी ,काकर्दे पंचक्रोशीतील सर्व पालक सभेस उपस्थित होते. ए. व्ही.कुवर यांनी सूत्रसंचालन केले तरविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या चव्हाण यांनी सभेच्या आयोजनाची व शाळा सुरू करण्यासंदर्भात रूपरेषा याबाबत माहिती दिली व सर्व मान्यवरांचे आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.