नंदूरबार l प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार यांनी काठी ता.अ.कुवा येथे अवैधपणे परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना महिंद्रा मॅक्ससह 8 लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि . ११ जानेवारी रोजी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क संचालक श्रीमती वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, राज्य उत्पादन शुल्क , नंदुरबार अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली . मिळालेल्या गुप्त बातमीनुसार काठी ते मोलगी रोड , मोलगी शिवार ता . अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे महिंद्रा कंपनीची मॅक्स तिचा परिवहन (क्रमांक MH – ३ ९ -४०३०) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ५ हजार बाटल्या ( १०० बॉक्स ) दिसून आले तेथे वाहनासह संशयित आरोपी जयसिंग अंतरसिंग पाडवी रा.काठी ता . अक्कलकुवा याला अटक करण्यात आली असून एकुण ८ लाखाचा रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९ ४९ अंतर्गत कलम ६५ ( अ ) ( ई ) , ८०,८१,८३ , ९ ० , ९ ८ ( २ ) , १०८ अन्वये करण्यात आली . सदरची कार्यवाही निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार डी . एम . चकोर , दुय्यम निरीक्षक एस.एस. रावते, दुनिरीक्षक पी . जे . मेहता दुय्यम निरीक्षक बी . एस . चोथवेजवान . सर्वश्री राजेंद्र एन पावरा, हेमंत डी पाटील , हितेश जेठे , अविनाश पाटील ,एम.एम. पाडवी , संदीप वाघ , इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास एस . एस . रावते दुय्यम निरीक्षक ब विभाग , नंदुरबार करीत आहे.








