Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे पुन्हा घरफोडी, एक लाखाची रोकड लंपास

team by team
January 11, 2022
in क्राईम
0
तळोदा येथे पुन्हा घरफोडी, एक लाखाची रोकड लंपास

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील श्रीराम नगर येथील बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे मालक दिपक भापकर यांच्या घरातुन अज्ञात चोरट्याने एक लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील श्रीराम नगर येथील रहिवासी दीपक मुरलीधर भापकर यांच्या घरात दि .९ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घर मालक बाहेर गावी असल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे लाकडी दरवाजाचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटात ठेवलेले ५०० रुपयाचा १२० नोटा असे ६० हजार रु रोख, व २०० रु च्या २० नोटा असे ४० हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात इसमाने लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार बागुल, यांच्यासह पो.उपनिरीक्षक अविनाश केदार, वाहतूक पो.विलास पाटील, सुभाष पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंदुरबार येथून फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते दरम्यान त्यानी ठष्याचे नमुने घेतले आहेत. दिपक मुरलीधर भापकर यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार बागुल हे करीत आहेत.
वाढत्या चोऱ्यामुळे शहरातील नागरिकांना देखील आपले घर बंद करून एखादा दिवस बाहेरगावी जाणेही चिंतेचे वाटत आहे. बाहेरगावी गेल्यानंतर माघारी येईपर्यंत आपल्या घरातील किंमती वस्तू सुरक्षित राहतील की नाही याची सतत काळजी असते. केवळ घरच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी सपाटाच लावला असल्याने व्यापारी वर्ग देखील चिंतेत आहे. चोऱ्या होऊन पोलिसांना चोर सापडतच नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . गेली काही महिने चोरट्यांनी बंद दुकाने व घरांना लक्ष्य करून रोकड आणि किंमती मुद्देमाल लंपास केला आहे. चोरी झाल्यानंतर चोरटे सापडतील आणि चोरीस गेलेला ऐवज मिळेल या आशेपोटी नागरिक पोलिस ठाण्यात धाव घेतात, मात्र त्यांच्या हाती निराशाच लागत आहे.
दरम्यान मागील तीन दिवसांपासून सातत्याने तळोदा शहरात होत असलेल्या चोऱ्यांमुळे तळोदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांनी गति चक्र फिरवून तातडीने या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, चायना आणि नायलोन मांज्याची सर्रास विक्री,कारवाई कधी होणार ?

Next Post

नंदूरबार व शहादा येथून तीन दुचाकी लंपास

Next Post

नंदूरबार व शहादा येथून तीन दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add