नंदूरबार l प्रतिनिधी
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात शेतकरी वर्ग आता पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या शेती सोबत तंत्र शुध्द पद्धतीने घरातल्या घरात मशरूम शेती करत असल्याने प्रायोगिक तत्वावर होणाऱ्या मशरूम शेतीला आता प्राधान्य मिळु लागले आहे. त्यामुळे त्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे.मशरूम शेती बाबत धडगाव तालुक्यातील काकरदा येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

वर्षानुवर्षा पासून पारंपारिक पद्धतीने शेती करत असलेला शेतकरी बांधव हा सातपुड्यातील डोंगर माथ्यावरील तसेच चढ उताराची व खडकाळ जमिन कसतो आहे .या शेतीत उत्पनाला अधिक मर्यादा आहेत.शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावण्या ऐवजी त्यांची आर्थिक स्थिती बिकट होत गेली.परिणामी येथील शेतकरी आणि भूमीहीन शेत मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगाराच्या संधी व इतर पर्याय शोधण्यासाठी स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहत नाही.मात्र आता येथील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन आधुनिक शास्त्रशुद्ध व किफायतशीर शेतीचे मार्गदर्शन व सहाय्यता मिळु लागल्याने शेतकरी आपल्या शेतात व शेतीत वेगवेगळे प्रयोग करु लागले आहेत.असाच एक प्रयोग सातपुडा व परिसरातील शेतकऱ्यांनी मशरूम शेतीच्या माध्यमातुन केलाय.या प्रयोगातून शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा मार्ग सापडलाय त्यामुळे प्रायोगिक तत्वावर चाललेल्या या मशरूम शेतीला आता अधिक मागणी वाढली आहे. वर्षातील बारा महिने करता येणारी मशरूम शेती ही लोकप्रिय होत आहे त्यासाठी अक्कलकुवा शहरा जवळील गंगथा या छोट्याशा गावातील सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे हे अथक परिश्रम घेत आहेत.
मशरूम शेती चे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाने आज सातपुड्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील काकरदा गावाच्या युवकाने मशरूम शेती केली आहे. संतोष पाडवी या युवकाने दहा बाय दहाच्या छोट्याशा घरात दीड महिन्यात तब्बल वीस हजार रुपया हून अधिक उत्पन्न घेतले आहे. या युवकाच्या यशस्वी गाथेने धडगाव तालुक्यातील काकडदा येथील शेतकरी प्रेरणा घेत मोठ्या प्रमाणात मशरूम शेतीकडे वाटचाल करीत आहेत.मशरूम शेती चे मार्गदर्शक राजेंद्र वसावे व लीलाताई वसावे यांनी सातपुड्यातील युवक वेगवेगळ्या व्यवसायात व वेगवेगळ्या क्षेत्रात जात असल्याने आर्थिक विकासाकडे वाटचाल करीत आहे व आधुनिक व्यावसायिक प्रशिक्षणाचे ही गरज आहे असे त्यांनी सांगितले धडगाव तालुक्यातील कृषी मंडळ अधिकारी पांडुरंग पाडवी व कृषी सहायक प्रवीण गावित यांच्या सहकार्याने काकरदा या गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेबद्दल माहिती दिली व संतोष पाडवी यांचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रशिक्षणार्थी ने मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेतले.








