Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मिरची तोडणीसाठी येणाऱ्या मजुरांचे वाहन दरीत कोसळले, तीन ठार बारा जण जखमी

team by team
January 7, 2022
in क्राईम
0
मिरची तोडणीसाठी येणाऱ्या मजुरांचे वाहन दरीत कोसळले, तीन ठार बारा जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मोडलगाव येथुन नंदुरबार तालुक्यातील लोय पिंपलोद येथे मिरची तोडणीसाठी येणाऱ्या मजुरांचे वाहन टेंबरीबारी घाटातून येत असताना वाहन दरीत कोसळल्याने अपघात घडला.यात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून बारा जण जखमी झाले आहेत. उदरनिर्वाहासाठी जाणाऱ्या मजुरांवर काळाने झडप घातल्याने सदरच्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मयतांमध्ये माय लेकासह बालकाचा समावेश आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील विरसिंग रायजा वळवी हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनातून मोडलगाव येथून मजुरांना मिरची तोडणीसाठी नंदुरबार तालुक्यातील लोय-पिंपलोद येथे आणत होता.यावेळी गोरंबा गावाच्या शिवारातील टेंबरेबारी घाटात कच्च्या रस्त्यावर अतितीव्र चढावावर त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले. घडलेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. यामध्ये वंतीबाई फत्या पटले (वय 37 वर्ष) विक्रांत फत्या पटले (वय 9 वर्ष) व सांगल्या सिपा वसावे (वय 10 वर्ष) यांचा मृत्यू झाला तर जखमींमध्ये हिरा फेरंग्यां पाडवी, जगिला दिल्या नाईक, सविता किरता नाईक, जयसिंग लाला नाईक, ललिता कीरता चौधरी, सांगा किरता चौधरी, सुनीता किल्या नाईक, संजय कागडा पाडवी, फेरंग्या खाल्या पाडवी, रोहित वजरे वसावे, सिपा कालश्या वसावे यांच्यासह आदीचा समावेश आहे.
जखमींना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. बारा जखमींपैकी एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मयत झालेल्यांपैकी एक महिला व दोन बालकांचा समावेश आहे.
गोरबा गावाच्या शिवारातील टेंबरीबारी घाटात सदरचा अपघात घडल्यावर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना धडगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान सदरचा दुर्दैवी अपघात घडल्याने मोडल गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पूजा कोमलसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक वीर सिंग वळवी याच्या विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात भांदवी कलम 304(अ), 279, 337, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 134/187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : या चार तालुक्यात आज आढळले 12 कोरोना रुग्ण

Next Post

राज्यस्तरीय एकेएसपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे संघ अमरावतीला रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add