Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय एकेएसपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे संघ अमरावतीला रवाना

team by team
January 6, 2022
in राज्य
0
राज्यस्तरीय एकेएसपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे संघ अमरावतीला रवाना

नंदुरबार | प्रतिनिधी-

सावकलाल समाज मंडळ अमरावती व युवाशक्ती सावकलाल कलाल समाज सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय ‘एकेएसपीएल’ फिरते चषक क्रिकेट स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे दोन संघ आज दि.६ जानेवारी रोजी अमरावतीला रवाना झाले.
सावकलाल समाज मंडळ अमरावती व युवाशक्ती सावकलाल कलाल समाज सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय ‘एकेएसपीएल’ फिरते चषक क्रिकेट स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथे उद्या दि. ७ जानेवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सदर सामने दि.७ ते ९ जानेवारीदरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठी येणार्‍या सर्व संघांमधील खेळाडूंची राहण्याची नास्त्याची व जेवणाची व्यवस्था अमरावती समितीतर्फे करण्यात आली आहे.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५१ हजार रुपये व फिरता चषक, व्दितीय बक्षीस ३१ हजार रुपये व फिरता चषक, तृतीय बक्षीस २१ हजार रुपये देण्यात येणार आहे.
महिलांचीदेखील स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी प्रथम बक्षीस २१ हजार व फिरता चषक, व्दितीय बक्षीस ११ हजार रुपये व फिरता चषक, तृतीय बक्षीस ७ हजार रुपये देण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय फिरता चषक सामन्यांचे हे प्रथम वर्ष असून यामध्ये जो संघ विजयी होईल, तो संघ पुढील वर्षी तोच चषक अमरावतीला सोबत घेऊन येईल. या सामन्यांना सर्व जिल्ह्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
या स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे दोन संघ आज सकाळी ७.३० वाजता अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसने अमरावतीकडे रवाना झाले. या संघांमध्ये अनिकेत कलाल, जितेंद्र कलाल, पराग बागुल, गणेश कलाल, हर्ष किनगावकर, भुपेंद्र कलाल, लकेश कलाल, कुशल कलाल, रोहित सोनवणे, रोहित कलाल, चिरायु सोनवणे, उमेश सोनवणे, विलास कलाल, महेश कलाल, चंद्रेश कलाल, मृगेश कलाल, पवन सोनवणे, अभय जावरे, राहूल कलाल, मयुर कलाल, गिरीष कलाल, हितेश कलाल, गौरेश कलाल, सागर कलाल, अक्षय कलाल, उमेश कलाल, राहूल सूर्यवंशी, संजय कलाल, कुणाल कलाल, सिद्धार्थ कलाल, मयुर संजयसा कलाल, यश कलाल यांचा समावेश आहे. या दोन्ही संघांचे नेतृत्व तळोदा कलाल समाजाचे अध्यक्ष संजय कलाल हे करत असून खेळाडूंचा सर्व खर्चदेखील त्यांनीच केला आहे. नंदुरबार कलाल समाज क्रिकेट टिमचे कप्तान महेश कलाल, उपकप्तान राहूल कलाल तर तळोदा कलाल समाज क्रिकेट संघाचे कप्तान पराग बागूल, उपकप्तान जितेंद्र कलाल हे आहेत. या दोन्ही संघांचे नंदुरबार कलाल समाजातर्फे स्वागत करण्यात येणार स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निश्‍चल गिरनार, रुपेश गिरनार, संदीप गिरनार, राकेश कलाल आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मिरची तोडणीसाठी येणाऱ्या मजुरांचे वाहन दरीत कोसळले, तीन ठार बारा जण जखमी

Next Post

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व क. महाविद्यालयात “मासिक पाळी व्यवस्थापन” विषयावर ऑनलाईन व्याख्यान

Next Post
भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व क. महाविद्यालयात “मासिक पाळी व्यवस्थापन” विषयावर ऑनलाईन व्याख्यान

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व क. महाविद्यालयात "मासिक पाळी व्यवस्थापन" विषयावर ऑनलाईन व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add