नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे समाज कल्याण विभागातर्फे अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेतर्ंगत ५० हजाराचे सहाय्याचा धनादेश जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी यांचा हस्ते ४ लाभार्थ्याना देण्यात आला.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेतर्ंगत ५० हजाराचे सहाय्याचे धनादेश जिल्हयातील ४ लाभार्थ्याना जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड.सिमा वळवी यांचा हस्ते देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला जि.प. समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जि.प. महिला बालकल्याण सभापती निर्मला राउत, जि.प.सदस्य सी.के.पाडवी,देवमन पवार,जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगांवकर आदी उपस्थीत होते.
सदर योजनेतर्ंगत किमान ४०टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या सदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास ५० हजार रूपयाचे प्रोत्साहनपर सहाय्य देण्यात येते त्यानुसार ४ लाभार्थ्याना धनादेश देण्यात आला.