नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देशासाठी काम करणारा असुन प्रदेशाने दिलेले कार्यक्रम उपक्रम कार्यकर्त्यांनी शतप्रतिशत राबवावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नंदुरबार येथील बैठकी प्रसंगी केले.
नंदुरबार येथे तेली मंगल कार्यालय येथे आयोजित आगामी कार्यक्रम नियोजन बैठकी प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रा.पंकज पाठक, शहराध्यक्ष नरेंद्र माळी आदी.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, दि.२१ जुन ते ६ जुलै दरम्यान प्रदेशाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार जागतिक योग दिवस, डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृतीदिन व जन्मदिवस, स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान, वृक्षारोपण, आणीबाणी काळा दिवस, मन कि बात आदि कार्यक्रम मंडलस्तरावरुन बुथ स्तरावर करण्याचे नियोजन करुन प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने समित्या गठीत करुन कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष नरेंद्र माळी व शहर सरचिटणीस खुशाल चौधरी यांनी मेहनत घेतली तर सुत्र संचालन शहर सरचिटणीस मुकेश अहिरे यांनी केले.