Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील दलित वस्तीतील विकास कामांकडे दुर्लक्ष,नागरीकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

team by team
July 13, 2021
in सामाजिक
0
तळोदा येथील दलित वस्तीतील विकास कामांकडे दुर्लक्ष,नागरीकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

तळोदा | प्रतिनिधी-

तळोदा शहरातील दलित वस्तीतील विकास कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दलित वस्ती समस्यांचे माहेरघर बनल्याबाबतचे निवेदन दलित वस्तीतील नागरिकांकडून मुख्याधिकारी सपना वसावा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरातील दलित वस्तीत राहणारे नागरिक असून मागील पाच ते सहा वर्षात दलित वस्तीत कोणत्याही प्रकारची ठोस विकास कामे झालेली नाहीत. यामुळे दलित वस्तीत विविध समस्या निर्माण झाल्या असून नगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दलित वस्तीत राहणार्‍या नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.
दलित वस्तीत वरांहाचा मुक्त संचार वाढला असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच समाज मंदिर परिसरात देखील नियमित स्वच्छता आवश्यक असून पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. समाज मंदिर समोरील बोअरवेल जवळ सुमारे सात ते बारा फूट खोलीचा खड्डा पडला आहे. हा खड्डा जीवघेणा ठरत असून स्थानिक रहिवाशांनी त्या खड्डावर फरशीचा तुकडा ठेवून झाकला आहे.  दलित वस्तीतून जाणारी उघड्या गटारीमुळे व दलित वस्तीला लागून असणार्‍या सार्वजनिक शौचालयामुळे दलित वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा कचरा व गाळ साचल्याने ही गटार देखील तुंबते. त्यामुळे अधिकच दुर्गंधी पसरते. ही गटार उघड्या स्वरुपात असल्याने डासांसह माशा व जीवघेणा विषारी किड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास दलित वस्तीत राहणार्‍या नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही नगरपालिकेची असेल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर अनिल पवार, आनंद शिंदे, संदीप जावरे, प्रविण नरभवर, सुनिल नरभवर, सरीता गौसावी, लिलाबाई सुर्यवंशी, मनिषा साठे, कल्पना चित्रकथे, कार्तिक शिंदे, अशोक अहिरे, संभु अहिरे, पुंडलिक तिजवीज, लताबाई तिजवीज, जितू तिजवीज, सुनिता सुरवाडे, कपिल खैरनार, सुभाष शिंदे, वैशाली नरभवर, निर्मला शिंदे, मयुर ब्राम्हणे, रत्ना रामराजे, दिलीप शिंदे, तुषार पानपाटील, मनोज ब्राम्हणे, नरेश ब्राम्हणे, सुनंदा पानपाटील, मुकेश अहिरे, अनिता बेडसे, कुसुमबाई अहिरे, शैलेंद्र अहिरे, गबा अहिरे, दिगंबर अहिरे, राजेश तिजवीज, दशरथ तिजवीज, हरचंद तिजवीज, सिध्दार्थ नरभवर, निखिल केदार, दिपक अहिरे, राहुल बेर्डे, सुमित नरभवर, अमोल वळवी, शरद सावळे, राहुल ब्राम्हणे, कपिल नरभवर, प्रणव नरभवर आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा

Next Post

जळगाव-भुसावळ रेल्वे मार्गाच्या तांत्रिक कामामुळे ३० गाड्या रद्द

Next Post
जळगाव-भुसावळ रेल्वे मार्गाच्या तांत्रिक कामामुळे ३० गाड्या रद्द

जळगाव-भुसावळ रेल्वे मार्गाच्या तांत्रिक कामामुळे ३० गाड्या रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add