Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा

Mahesh Patil by Mahesh Patil
July 13, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार | प्रतिनिधी

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची २१ जुलै २०२१ रोजीची बकरी ईद (चंद्र दर्शनावर अवलंबून असून) साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
सध्या लागू करण्यात आलेले ब्रेक दि चेनचे दि.४ जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सर्व निर्बंध कायम लागू राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जात पडताळणीचे रिक्त सहआयुक्त त्वरीत भरावे, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेची मागणी

Next Post

तळोदा येथील दलित वस्तीतील विकास कामांकडे दुर्लक्ष,नागरीकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

Next Post
तळोदा येथील दलित वस्तीतील विकास कामांकडे दुर्लक्ष,नागरीकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

तळोदा येथील दलित वस्तीतील विकास कामांकडे दुर्लक्ष,नागरीकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र प्रवेशासाठी मुदतवाढ

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र प्रवेशासाठी मुदतवाढ

June 27, 2022
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

June 27, 2022
शिवसेनेचे बंडखोर पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

शिवसेनेचे बंडखोर पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

June 27, 2022
नवापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा

नवापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा

June 27, 2022
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

वीज कंपनीच्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञास मारहाण

June 27, 2022
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 27 जून राशिभविष्य

June 27, 2022

एकूण वाचक

  • 1,667,568 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group