तळोदा l प्रतिनिधी
गेल्या चार,पाच दिवसांपासून पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरी वाढविण्याबाबत व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दाखवून त्यांचा मागणी नुसार ५० रुपये मजूरी वाढविल्यान संपाच्या तिढा सुटूल्यामुळे मजुरांनी देखील संप मागे घेतला आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि मजुरांच्या या वाढीव मजुरीच्या भार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर लादू नये.अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पपईची तोड करणाऱ्या मजुरांना पपईचे व्यापारी प्रती टन साडे तीनशे रुपये मजूरी देत असतात. परंतू वाढत्या महागाईमुळे ही मजूरी परवडत नसल्याने मजुरांनी गेल्या चार ,पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते.या मजुरांची टणास व्यापाऱ्यांनी पन्नास रुपयांची वाढ करावी अशी त्यांची मागणी होती.मात्र मजुरांच्या या संपामुळे शेतकऱ्यांची पपई तोड देखील थांबली होती.साहजिकच शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत होते.कारण झाडावरच पपई पिकून खाली पडत होती.शिवाय वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भाव देखील होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा अडचणीत मोठी वाढ झाली होती.साहजिकच मजुरांच्या या वाढीव मजूरी बाबत व्यापाऱ्यांनी तोडगा काढावा अशी शेतकऱ्यांची देखील अपेक्षा होती.मजुरांच्या संपाची दखल घेवून मंगळवारी शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत व्यापारी ब मजुरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.वाढीव मजूरी बाबत चर्चा होवून मागणी नुसार टणास पन्नास रुपये वाढीव दर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे मजुरांनी देखील आपले कामबंद आंदोलन मागे घेवून पपई तोडणीस जाण्याचा निर्णय घेतला.व्यापारी व मजूर यांच्या सकारात्मक निर्णयाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तथापि या वाढीव मजुरीच्या भार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर लादू नये अशीही अपेक्षा शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.कारण पपई तोडीची मजूरी हे व्यापारी आपल्या खिशातून न देता शेतकऱ्यांकडून वसूल करीत असतात.सद्या ३५० मजूरी शेतकरी कडून घेतली जात आहे.त्यामुळे हा वाढीव भुर्दंड व्यापर्यानीच सोसावा असेही शेतकरी सांगतात.
सातत्याने घसरतोय आहे पपईच्या दर
सातत्याने पपईच्या दर घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.पपईच्या उत्पादनावर केलेला आर्थिक खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी अक्षरशः हवालदील झाला आहे.कारण रासायनिक खते,पपईची रोपे व लागवडीच्या अवाढव्य खर्च पाहता तेवधाही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. सध्या तर पावणे तीनशे रुपये पपईच्या भाव झाला आहे. स्थानिक काही व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाच्या फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप आहे.व्यापाऱ्यांनी मजुरांप्रमानेच पपईच्या पुरेशा दराबाबत सकारात्मक विचार करावा.अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे.








