Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अथक प्रयत्नांनी मुलीला मिळाले जीवदान, पाच लाखात एखाद्याला होतो गॅस गॅंग्रीन आजार

team by team
December 29, 2021
in आरोग्य
0
अथक प्रयत्नांनी मुलीला मिळाले जीवदान, पाच लाखात एखाद्याला होतो गॅस गॅंग्रीन आजार

नंदुरबार l प्रतिनिधी
सुमारे पाच लाख मधून एखाद्याला होणारा गॅस गॅंग्रीन आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. त्यातून 14 वर्षाच्या मुलीला जीवदान मिळाले. पाच डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
नंदुरबार येथील रेल्वे पोलीस असलेले प्रकाश गोसावी यांची भाची भाग्यश्री संजय गोसावी ( वय १४ वर्ष) हिला किरकोळ आजार झाला. ती तऱ्हाडी येथे राहते. तिचे वडील संजय गोसावी शेतकरी तर आई योगिता ही गृहिणी आहे. भाग्यश्रीला गावातील डॉकटरांकडे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला बरे वाटेल लागले मात्र ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले तेथे एक गाठ तयार झाली.
ती गाठ वेदनादायी होती म्हणून तिला शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तत्काळ धुळे येथे नेण्यास सांगितले. पालकांनी भाग्यश्रीला धुळे येथील छत्रपती या खाजगी रुग्णालयात नेले. तेथील यंत्रणेने भाग्यश्रीच्या तपासण्या केल्या.
गॅस गॅंग्रीन
भाग्यश्री च्या तपासणीमध्ये तिला गॅस गॅंग्रीन हा आजार झाल्याचे निदर्शनास आले. हा आजार पाच-दहा वर्षातून, आणि पाच लाखातून एखाद्याला होतो.
उपचाराबाबत हतबलता
तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी भाग्यश्रीवर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. जर ही शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर मध्ये केली तर ते ऑपरेशन थेटर आगामी दहा दिवस पर्यंत वापरता येत नाही तसेच आवश्यकता भासल्यास दवाखानाही बंद ठेवावा लावू शकतो, असे छत्रपती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालय
भाग्यश्रीला तिच्या पालकांनी जिल्हा रुग्णालयात नेले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. परवेज मुजावर, सहयोगी प्रा. डॉ.अजय सुभेदार, सहाय्यक प्रा. डॉ. अविनाश पावरा, प्लास्टिक सर्जरीसाठी सहाय्यक प्रा. डॉ. कल्पेश वोरा यांच्या पथकाने तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे सात शस्त्रक्रिया केल्या. सुमारे दोन महिने तिच्यावर उपचार करण्यात आले. आज सायंकाळी तिला डॉक्टरांनी घरी जाण्याचा सल्ला दिला.
खर्च कमी
या सगळ्या उपचारासाठी भाग्यश्रीच्या पालकांना 70 हजार रुपयांचा खर्च आला. जर सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार खाजगी रुग्णालयात केले असते तर हा खर्च सुमारे सात लाख रुपये झाला असता. तिची प्रकृती चांगली आहे.

गॅस गँगरीन आजार हा दुर्धर व घातक असतो.
माझ्या पूर्ण टीम ने आतोनात मेहनत घेऊन आधुनिक पद्धतीने “VAC” ड्रेसींग ने जखम लवकर बरी करून भाग्यश्री गोसावी या रुग्णास पुन्हा तीच्या पायावर उभे केले.याची पूनराव्रृत्ती परत न होणेसाठी ग्रामीण भागातील डॉक्टरांनी कुठलेही इंजेक्शन (Intramuscular) देतांना Aseptic precaution घेणे व नवीन निर्जंतुक सिरींज निडल वापरणे नितांत गरजेचे आहे.

डॉ.परवेज मुजावर
प्रा.व विभागप्रमुख ,शल्यचिकित्सा शास्त्र
सर्वोपचार रूग्णालय धुळे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हयात आज आढळला कोरोना रुग्ण

Next Post

पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरीत ५० रुपयांची वाढ केल्याने पाच दिवसापासून सुरू असलेला संपाचा तिढा सुटला

Next Post
पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरीत ५० रुपयांची वाढ केल्याने  पाच दिवसापासून सुरू असलेला संपाचा तिढा सुटला

पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरीत ५० रुपयांची वाढ केल्याने पाच दिवसापासून सुरू असलेला संपाचा तिढा सुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add