सारंगखेडा l प्रतिनिधी
एखाद्या मोठ्या उद्योगपतीकडेही अकरा कोटीची कार नसेल , पण सारंगखेडा येथील अश्व बाजारात आज दि.२४ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या अल्बक्ष या घोडयाची किंमत तब्बल अकरा कोटी आहे . यावर कुणाचा विश्वास बसणार नाही , पण हे सत्य आहे . भारताचा चॅम्पियन काही औरच आहे . महिन्याकाठी लाखावर खर्च केवळ त्याच्या खुराक आणि देखभालीवर होतो , या अश्वाची राहण्याची व्यवस्था एका एसी गाडीमध्ये करण्यात आली आहे . त्याला राईडिंग साठीच फक्त बाहेर काढण्यात येते हे विशेष .
अल्बक्षचे आज पहाटे सारंगखेडा येथे आगमन झाले . या अश्व मालक आर .पी .गील . लुधीयाना ( पंजाब ) यांचे स्वागत चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल व प्रणवराजसिंह रावल यांनी केले . सारंगखेडा येथील . यात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या अश्व बाजार हा देशाचा घोडे बाजाराचे नेतृत्व करतो . या अश्व बाजाराला चेतक फेस्टीव्हलची जोड मिळाली आहे . या अश्व बाजारात १ हजार ५०० अश्वांपैकी पाचशेहून अधिक अश्वांची किमंत लाखोंवर आहे . आता पर्यंत २०१९ मध्ये शान नावाचा सर्वात महागडा अश्व १० कोटी रुपयांचा आलेला होता . यंदा मात्र त्या किंमतीचा विक्रम मोडून . भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष नावाचा अश्व ज्याची किमंत आहे . तब्बल ११ कोटी रुपये रुपये त्याच्या खाण्यापिण्यासह देखरेखीवर महिन्याला एक लाखांवर खर्च आहे . या याशिवाय पंजाब मध्ये झालेल्या अश्व स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला.
अलीसा इंसुदे देह दरबार अशी ब्लड लाईन आहे. त्याचे वय ४. वर्ष आहे . त्याची उंची ६ फुट ८ इंची इतकी आहे . अश्व बाजारात एसी टेंट मध्ये व्हीआय पी कक्षात त्याची ५० बाय ५० च्या जागेवर राजेशाही थाटात राहण्याची व्यवस्था केली आहे . चेतक फेस्टीव्हल मध्ये दरवर्षी राजकीय , सिने अभिनेते , अभिनेत्री सेलिब्रिटी म्हणून येतात . यंदा या ठिकाणी अल्बक्ष नावाचा अश्वच सेलिब्रिटी झाला आहे . अश्वांचा राजा असलेला व भारतातील चॅम्पियन ठरलेला आहे .
अल्बक्ष अश्वचा असा आहे थाट
राहण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा. सेवेसाठी दोन सेवेकरी. कक्षाच्या बाहेर येताना होणारी पूजा. पूजेची देखील विशिष्ट पद्धत. अंगाला उष्णता लागू नये म्हणून केली गेलेली काळजी.कक्षात परत जाताना होणारी पूजा. त्याची काढली जाणारी दृष्ट. हे कोणा एका राज्याचे राजपुत्राचे वर्णन असून येथील अश्व बाजारात आलेल्या अकरा कोटी रुपये किमतीच्या अश्वाची हा थाट आहे.








