Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तब्बल ११ कोटीचा भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष सारंगखेड्यात दाखल

team by team
December 24, 2021
in कृषी
0
तब्बल ११ कोटीचा भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष सारंगखेड्यात दाखल

सारंगखेडा l प्रतिनिधी
एखाद्या मोठ्या उद्योगपतीकडेही अकरा कोटीची कार नसेल , पण सारंगखेडा येथील अश्व बाजारात आज दि.२४ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या अल्बक्ष या घोडयाची किंमत तब्बल अकरा कोटी आहे . यावर कुणाचा विश्वास बसणार नाही , पण हे सत्य आहे . भारताचा चॅम्पियन काही औरच आहे . महिन्याकाठी लाखावर खर्च केवळ त्याच्या खुराक आणि देखभालीवर होतो , या अश्वाची राहण्याची व्यवस्था एका एसी गाडीमध्ये करण्यात आली आहे . त्याला राईडिंग साठीच फक्त बाहेर काढण्यात येते हे विशेष .
अल्बक्षचे आज पहाटे सारंगखेडा येथे आगमन झाले . या अश्व मालक आर .पी .गील . लुधीयाना ( पंजाब ) यांचे स्वागत चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल व प्रणवराजसिंह रावल यांनी केले . सारंगखेडा येथील . यात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या अश्व बाजार हा देशाचा घोडे बाजाराचे नेतृत्व करतो . या अश्व बाजाराला चेतक फेस्टीव्हलची जोड मिळाली आहे . या अश्व बाजारात १ हजार ५०० अश्वांपैकी पाचशेहून अधिक अश्वांची किमंत लाखोंवर आहे . आता पर्यंत २०१९ मध्ये शान नावाचा सर्वात महागडा अश्व १० कोटी रुपयांचा आलेला होता . यंदा मात्र त्या किंमतीचा विक्रम मोडून . भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष नावाचा अश्व ज्याची किमंत आहे . तब्बल ११ कोटी रुपये रुपये त्याच्या खाण्यापिण्यासह देखरेखीवर महिन्याला एक लाखांवर खर्च आहे . या याशिवाय पंजाब मध्ये झालेल्या अश्व स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला.
अलीसा इंसुदे देह दरबार अशी ब्लड लाईन आहे. त्याचे वय ४. वर्ष आहे . त्याची उंची ६ फुट ८ इंची इतकी आहे . अश्व बाजारात एसी टेंट मध्ये व्हीआय पी कक्षात त्याची ५० बाय ५० च्या जागेवर राजेशाही थाटात राहण्याची व्यवस्था केली आहे . चेतक फेस्टीव्हल मध्ये दरवर्षी राजकीय , सिने अभिनेते , अभिनेत्री सेलिब्रिटी म्हणून येतात . यंदा या ठिकाणी अल्बक्ष नावाचा अश्वच सेलिब्रिटी झाला आहे . अश्वांचा राजा असलेला व भारतातील चॅम्पियन ठरलेला आहे .
अल्बक्ष अश्वचा असा आहे थाट
राहण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा. सेवेसाठी दोन सेवेकरी. कक्षाच्या बाहेर येताना होणारी पूजा. पूजेची देखील विशिष्ट पद्धत. अंगाला उष्णता लागू नये म्हणून केली गेलेली काळजी.कक्षात परत जाताना होणारी पूजा. त्याची काढली जाणारी दृष्ट. हे कोणा एका राज्याचे राजपुत्राचे वर्णन असून येथील अश्व बाजारात आलेल्या अकरा कोटी रुपये किमतीच्या अश्‍वाची हा थाट आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

Next Post

तळोदा तालुक्यात अध्यक्ष “आपल्या दारी “उपक्रम राबवित संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरीचे पत्र लाभार्थ्यांना थेट घरपोच वाटप

Next Post
तळोदा तालुक्यात अध्यक्ष “आपल्या दारी “उपक्रम राबवित संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरीचे पत्र लाभार्थ्यांना थेट घरपोच वाटप

तळोदा तालुक्यात अध्यक्ष "आपल्या दारी "उपक्रम राबवित संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरीचे पत्र लाभार्थ्यांना थेट घरपोच वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add