नंदुरबार l प्रतिनिधी
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकांना शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले जाते ,परंतु माध्यमिक विभागाच्या शिक्षकांना कोणताही पुरस्कार दिला जात नव्हता त्यामुळे सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती या बाबीचा विचार करून माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यां मध्ये चर्चा होऊन या वर्षापासून सहा गुणवंत शिक्षक व सहा मुख्याध्यापक यांची जिल्ह्यातुन निवड करून त्यांना गौरविण्यात येण्याचा पायंडा पाडून यावर्षी निवड झालेल्या बारा शिक्षकांचा गौरव समारंभ याहामोगी सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ,शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके ,राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के. पाटील उपस्थित होते, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, डॉक्टर युनूस पठाण, व चंद्रकांत पाटील उपस्थित होते. प्रास्तवीक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी केले ,त्यात त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक व मुख्याध्यापक यांचा गौरव करण्यात आला त्याच फयाजखान (नंदुरबार) योगेश कुमार गवते (नंदुरबार )धनंजय वाघ (कोराई) , दिनेश राठोड(वान्याविहिर), सुरेखा गुजर (म्हसावद )अनिल सनेर (खेड दिगर), शेख इस्माईल (मोड़), शरद पाटील (सुरवानी), रमेश राजपूत (धड़गाँव), संजय जाधव (नवापुर ),अनिल वळवी (नवापूर) यांचा गुणवंता मध्ये समावेश होता .
त्यानंतर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे पहिल्या अंकाचे प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व सभापती यांच्या हस्ते करण्यात आले.मार्गदर्शक पुस्तिकेचे संयोजन दिनेश साळुंखे यांनी केले होते.पुस्तिका प्रकाशनानंतर प्रमुख पाहुने जे.के. पाटील यांनी जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शिक्षकांना शिक्षक दिन ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होतात परंतु माध्यमिक शिक्षकांना मात्र दिले जात नाही याची खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली ,मुख्याध्यापकाने मार्गदर्शन पुस्तिकाचा वापर करण्याचे आवाहन केले .
माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी माध्यमिक शिक्षकांना ही कार्यास प्रेरणा मिळावी त्यांचा सन्मान व्हावा यासाठी मुख्याध्यापक संघाच्या मदतीने गुणवंत पुरस्कार देण्याची भूमिका घेतली.
मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी शिक्षकांनी अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करावे ,विद्यार्थी घड़वावा याबरोबरच लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या पार पाडून १०० टक्के लसीकरण कार्य पूर्ण करण्याचे आव्हान केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड.सिमा वळवी यांनी समाज जडणघडणीत शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा असून प्राथमिक शिक्षक बरोबरच माध्यमिक शिक्षकांचे ही कार्य महत्त्वाचे आहे याची दखल घेऊन पुढील वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत माध्यमिक शिक्षकांनाही आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देण्याचे जाहीर केले .माध्यमिक विभागाने लसीकरणात दिनांक आठ ते दहा दरम्यान होणाऱ्या विशेष लसीकरण शिबिरात सहभाग नोंदवून कार्य पूर्ण करण्याचे आवाहन केले .
जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे लसीकरणाच्या शिबिरात सहभाग नोंदवुन 100 टक्के लसीकरणाचे कार्य पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य मुख्याध्यापक संघाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष सुनील भामरे यांनी दिले .
आभार मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र जोशी यांनी मांडले, सूत्र संचालन किरण दाभाड़े यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील ,नाशिक विभागाचे अध्यक्ष सुनील भामरे, सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, उपाध्यक्ष निमेंश सूर्यवंशी, जयदेव पाटील, कालिदास पाठक, कपूरचंद मराठे, दिनेश साळुंखे, मनोहर साळुंखे ,आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.








