तळोदा l प्रतिनिधी
शहरातील व्यापारी प्रदीप ठक्कर यांचे महामार्गावर खते,बियाणेचे दूकान आहे.या ठिकाणी आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील 3 हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असून चोरटे दुकानातील सीसी टीवी कॅमेरात कैद झाले आहेत.
या बाबत सविस्तर वृत असे की, तळोदा शहरातील व्यापारी प्रदीप ठक्कर यांचे महामार्गवर अविश ॲग्रो म्हणुन दूकान आहे.चोरट्यांनी आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील 3 हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. पोलिसांना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आनंद सोनार यांनी याबाबत माहिती दिली.पोलिस उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.








