नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने २६ डिसेंबर २०२१ रोजी होणार्या मुले व मुलींच्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या संघाची निवड चाचणी शनिवार ११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेली आहे.
क्रॉसकंट्रीसाठी निवड चाचणी राज्य संघटनेने प्रमाणित केलेल्या विविध वयोगटात पुढील होणार आहे. यात १६ वर्षा खालील मुले व मुली (२ किलो मीटर), १८ वर्षा खालील मुली (४ किलो मीटर) आणि मुले (६ किलो मीटर) २० वर्षा खालील मुली (६ किलो मीटर) आणि मुले (८ किलो मीटर) तसेच खुल्या वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी (१० किलो मीटर) मध्ये निवड चाचणी होणार आहे. खेळाडूंनी ११ डिसेंबर २०२१ सकाळी ७ वाजता आपल्या जन्माचा दाखला, आधार कार्ड घेऊन जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी चंद्रकांत रघुवंशी, सचिव प्रा.दिलीप जानराव, स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.मयुर ठाकरे (९७६७६७७०५६) यांनी केले आहे.








