Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागु होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकला : भाजपाची मागणी

team by team
December 8, 2021
in राजकीय
0
राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागु होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकला : भाजपाची मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
नदुरबार राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागु होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात , अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे . याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले असून सदरचे निवेदन राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे . निवेदनाची दखल घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे .
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्याकरिता अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत असल्याचा दिखावा करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे . सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या २ वर्षापासुन ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्याकरीता आयोग गठीत केला परंतु आयोगाला कोणतेही अधिकार सुपूर्त केले नाहीत . आयोगाला आवश्यक ४५० कोटींच्या निधीची तरतूद केली नाही त्यामुळे एम्पेरिकल डाटा गोळा करण्याकरिता आयोगाला एजेंसी नियुक्त करता आली नाही परिणामी सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित एम्पेरिकल डेटागोळा करन्याकरिता राज्य सरकार कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे . आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेऊ नये , सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात , अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन उभारेल , असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे . जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे यांच्यासह लियाकत बागवान , लक्ष्मण माळी आदी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

Next Post

नंदुरबारहुन – सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्सने सायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

Next Post
नंदुरबारहुन – सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्सने सायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

नंदुरबारहुन - सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्सने सायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add