Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत भंडारा संघाला दुहेरी मुकूट, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते बक्षिस वितरण

team by team
December 6, 2021
in राज्य
0
राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत भंडारा संघाला दुहेरी मुकूट, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते बक्षिस वितरण

नंदूरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्यावतीने ४५ व्या वरिष्ठ गट टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटक संजय होळकर, महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे सचिव अनिल वर्पे, खोखोचे राष्ट्रीय पंच अनिल रौंदळ, जिल्हाध्यक्ष पंकज पाठक, पोलीस दलातील खेळाडू आनंदा मराठे, जिल्हा सचिव प्रा.डॉ.मयुर ठाकरे, रेफ्री बोर्डाचे चेअरमन ॲड.मृणाल बांडेबुचे, जितेंद्र पगारे, निलेश गावित, क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी, धुळे जिल्हा सचिव प्रकाश पाटील, तलवारबाजी प्रशिक्षक विशाल पवार आदींच्या उपस्थिती उपस्थित होते. स्पर्धेत मुले व मुली दोघा गटात भंडारा संघ विजयी ठरला तर मुलांमध्ये पुणे आणि मुलींमध्ये नागपूर संघ उपविजेते ठरले. तिसर्‍या क्रमांक मुलांमध्ये नागपूर तर मुलींमध्ये पुणे या पटकाविला. विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पदक वाटप करण्यात आले. राज्यातून आलेल्या सर्व खेळाडूमधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. यात मुलांच्या संघात शुभम पांडे (भंडारा), तेजस गाडगीळ (कोल्हापूर), प्रथमेश ढवळे (पुणे), रोहित बागवे (पुणे), निहाल (नागपूर), मनीष सनेर (नंदुरबार) तर मुलींमध्ये नंदिनी फेडर (भंडारा), रेणुका व्यवहारे (भंडारा), मनस्वी नांदुरकर (पुणे), आचल बोबटे (नागपूर), आदित्य साळवे (भंडारा), प्राजक्ता बागूल (नंदुरबार) या खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात निवड झाली असून हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धा यशस्वितेसाठी राजेश्वर चौधरी, गोपाल चव्हाण, जय जेठे, रोहित राजपूत, चेतन जवेरी, चेतना रणे, प्रदीप माळी, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भागूराव जाधव तर आभार जितेंद्र पगारे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार

Next Post

घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणल्याबद्दल नागरीकांनी केला पोलीस अधीक्षकांसह पथकाचा सत्कार

Next Post
घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणल्याबद्दल नागरीकांनी केला पोलीस अधीक्षकांसह पथकाचा सत्कार

घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणल्याबद्दल नागरीकांनी केला पोलीस अधीक्षकांसह पथकाचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add