Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणल्याबद्दल नागरीकांनी केला पोलीस अधीक्षकांसह पथकाचा सत्कार

team by team
December 6, 2021
in क्राईम
0
घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणल्याबद्दल नागरीकांनी केला पोलीस अधीक्षकांसह पथकाचा सत्कार

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणल्याबद्दल नागरीकांना पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचा नागरिकांनी सत्कार केला
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१० नोव्हेंबर रोजी नंदुरबार शहरातील रुख्माई नगर येथे दिवसा किशोर माणिक रौंदळ यांचे घराचे कुलूप तोडुन १० हजार रुपये रोख व २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घोरुन नेल्याची घटना घडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अमलदारांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली तेथील घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंद नगर येथे राहणारे रजनी सुरेश मंगळे यांचे देखील घराचे कुलूप तोडून २० हजार रुपये रोख व ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरून नेल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकासह देवचंद नगरकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी भरधाव वेगाने निघून पोलीसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला परंतु ते पळुन जाण्यात यशस्वी झाले . दोन्ही संशयीतांचा आजूबाजूच्या परिसरात रात्रभर शोध घेवुन देखील ते मिळुन आले नाही . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदौर येथे १२ दिवस तसेच पुणे येथे सलग ८ दिवस मुक्काम करून गुन्ह्यातील पळुन गेलेल्या दोन्ही आरोपीतांना शिताफीने ताब्यात घेवून नंदूरबार शहरात दिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील १० लाख १० हजार रुपये किमतीचे २१ तोळे वजनाचे सोन्याचे चांदीचे दागिने १५ हजार रुपये रोख , २ हजार रुपये किमतीचे मोबाईल व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहेत . ताब्यात घेण्यात आलेला शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा रा.हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता.जि. सिहोर मध्य प्रदेश याचेविरुध्द मध्य प्रदेश , महाराष्ट्र , छत्तीसगढ़ राज्यात घरफोडीचे एकुण ६९ गुन्हे दाखल त्यांना अटक देखील झालेली आहे . नंदुरबार शहरात दिवसा झालेल्या धाडसी परफोडीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी गेलेली सर्व मालमत्ता परत मिळविल्याबद्दल नंदुरबार शहरातील रुखमाई नगर , देवचंद नगर येथील किशोर माणिक रौंदळ , दरबारसिंग कोमलसिंग गिरासे , प्रविण शांताराम सावंत , प्रा . डॉ . गिरीश पवार , जगदीश बेडसे , राजेंद्र दगा माळी , रविंद्र आनंदा अहिरे तसेच इतर ६ रहिवासी यांनी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार दिपक गोरे , महिला पोलीस हवालदार पुष्पलता जाधव , पोलीस नाईक राकेश बसावे , पोलीस अमलदार विजय ढिवरे , अभिमन्यु गावीत यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला . तसेच सत्कार केलेल्या नागरीकांनी नंदुरबार पोलीसांच्या कामगिरीबद्दल अभिमान असून समाधान व्यक्त केले आहे . व नंदुरबार पोलीसांच्या पुढील वाटचालीस व कामगिरीस पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या .

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत भंडारा संघाला दुहेरी मुकूट, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते बक्षिस वितरण

Next Post

मालदा ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध

Next Post
मालदा ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध

मालदा ग्रुप ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add