येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ तसेच बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात सुमारे पंचवीस दात्यांनी रक्तदान केले. यावेळी कोरोना योद्धांचा सत्कारही करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया कमी प्रमाणात होत होत्या. परंतु कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने रुग्णालयात शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजूंना संकटसमयी रक्त पुरवठा व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद देत सुमारे २५ दात्यांनी रक्तदान केले. तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देणारे कोरोना योद्धांचाही यावेळी बडगुजर समाजातर्फे गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर, उपाध्यक्ष रविंद्र बडगुजर, सचिव अश्विन बडगुजर, खजिनदार देविदास बडगुजर, सल्लागार पंडीत बडगुजर, सदस्य दिलीप बडगुजर, गणेश बडगुजर, भरत कोतवाल, प्रकाश बडगुजर, विलास बडगुजर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुनिता बडगुजर, उपाध्यक्षा पौर्णिमा बडगुजर, सचिव रेणुका बडगुजर, सदस्या अनिता बडगुजर, आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाचे सौ.खताळे, जयेश सोनवणे, महेंद्र चव्हाण, रोहित चव्हाण, ईश्वर वसावे, अहमद पिंजारी आदींनी काम पाहिले.