Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

झराळी येथे संस्थाचालकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

team by team
November 29, 2021
in शैक्षणिक
0
झराळी येथे संस्थाचालकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

नंदूरबार l प्रतिनिधी

शैक्षणिक संस्थाचालकांना येणार्‍या विविध अडीअडचणी, समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी तालुक्यातील झराळी येथील बीकेफार्म हाऊसवर जिल्हयातील निवडक संस्थाचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात नंदुरबार जिल्ह्याचा सर्वात नीच्चांक आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, शालेय व्यवस्थापनावर विविध समस्या व उपाययोजना करणे, संस्थाचालकांना येणार्‍या अडचणींसंदर्भात समन्वय असणे, शालेय कामकाजात सुधारणा घडवून आणणे संस्थाचालकांचे सेमिनार घेणे, विविध शासन निर्णय कायदे व न्याय निर्णयाचा अभ्यास संस्थाचालकांना करून देणे, अधिकारी व मंत्रालय स्तरावरील कामकाजासाठी कार्यक्षम संस्थाचालकांचा गट तयार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बीके फार्म हाऊसवर निवडक संस्थाचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत संस्थाचालकांचे सक्षम व ज्यांना संस्थाच्या समस्यांसंदर्भात ज्ञान आहे अशा होतकरू व्यक्तींचा संस्थाचालक संघटनेत समावेश करावा असेही ठरवण्यात आले. याबाबतीत जिल्हा स्तरावर होणार्‍या बैठकीस जास्तीत जास्त संस्थाचालकांनी सहभाग घ्यावा याबाबत श्री.रघुवंशी यांनी आवाहन केले. बैठकीला माजी जि.प.सभापती अभिजीत पाटील,  सुहास नटावदकर, राजेंद्र गावित, निखिल तुरखीया, नागेश पाडवी, विजय गावित, शेखर पाटील, विवेक पाटील, सौ.प्राप्ती पाटील, राजेश पटेल, युवराज पाटील, जितेंद्र पाटील आदी संस्थाचालक उपस्थित होते. तसेच या बैठकीला काही कारणामुळे उपस्थित राहू न शकलेल्या  आ.शिरीष नाईक, डॉ.नरेंद्र पाडवी, मकरंद पाटील,  भरत गावित यांनी रघुवंशी यांना दूरध्वनीवर संपर्क साधला व बैठकीचे वृत्त जाणून घेतले. कार्यक्रमाचे  नियोजन पुुष्पेन्द्र रघुवंशी यांनी केल्याबद्दल युवराज पाटील व जितेंद्र पाटील यांनी संस्थाचालकांतर्फे कौतुक करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

डीडीसी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि. 1 डिसेंबर रोजी निवड, या पदावर कोणाची लागेल वर्णी ?

Next Post

वाडी पुनर्वसन येथे प्रतिबंधित बियर साठ्यासह ३५ लाख ५५ हजाराचा माल जप्त, एकास अटक

Next Post
वाडी पुनर्वसन येथे प्रतिबंधित बियर साठ्यासह ३५ लाख ५५ हजाराचा माल जप्त, एकास अटक

वाडी पुनर्वसन येथे प्रतिबंधित बियर साठ्यासह ३५ लाख ५५ हजाराचा माल जप्त, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add