Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डीडीसी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि. 1 डिसेंबर रोजी निवड, या पदावर कोणाची लागेल वर्णी ?

team by team
November 28, 2021
in राजकीय
0
डीडीसी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि. 1 डिसेंबर रोजी निवड, या पदावर कोणाची लागेल वर्णी ?

नंदूरबार । प्रतिनिधी

धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि. 1 डिसेंबर रोजी निवड होणार असून जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांची अध्यक्ष पदासाठी निवड निश्चित मानली जात आहे. बँकेचे उपाध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्यास दिले जाण्याची शक्यता आहे. या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.
धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 17 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात विविध मतदार संघातून माजी आ. राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील, दर्यावगीर महंत, हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले, अमरसिंग गावीत, शिला पाटील, सीमा रंधे, भरत माळी, प्रभाकर चव्हाण, आ. शिरीषकुमार नाईक, माजी आ. प्रा. शरद पाटील, शामकांत सनेर, भगवान पाटील, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी, संदीप वळवी हे नवनिर्वाचित सदस्य आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि. 1 डिसेंबर रोजी निवड होणार असून जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी 1 डिसेंबरला विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. त्या दिवशी उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते 11.15 वाजेपर्यंत भरता येईल. उमेदवारी अर्जांची छाननी सकाळी 11.15 ते 11.25 वाजेदरम्यान होईल. वैध अर्जांचे प्रकाशन सकाळी 11.30 वाजता होईल. माघारीसाठी सकाळी 11.35 ते 11.40 असा वेळ असेल. सकाळी 11.50 वाजता उमेदवारी अर्ज प्रसिध्द करण्यात येईल. दोन्ही पदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरल्यास दुपारी 12 ते 12.30 वाजेदरम्यान मतदान घेण्यात येईल. त्यानंतर लगेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतमोजणी करुन निकाल जाहीर करण्यात येईल. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांची अध्यक्ष पदासाठी निवड निश्चित मानली जात आहे. बँकेचे उपाध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्यास दिले जाण्याची शक्यता आहे. या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

Next Post

झराळी येथे संस्थाचालकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Next Post
झराळी येथे संस्थाचालकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

झराळी येथे संस्थाचालकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add