Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरीट येथे उसाच्या शेतात महिलेचा खून करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन अटक

team by team
July 6, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
कोरीट ता. नंदुरबार येथे उसाच्या शेतात महिलेचा निघृण खून करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन अटक करण्यात आली आहे
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३ जुलै रोजी सकाळी उषाबाई हिरामण कोळी (४६) रा. कोरीट ता. जि. नंदुरबार या नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वत:चे शेतात कामासाठी गेल्या होत्या, परंतु संध्याकाळ होवूनही त्या घरी न आल्याने त्यांचे पती हिरालाल झुलाल कोळी रा कोरीट ता.नंदुरबार हे त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या शेताकडे गेले, परंतु त्या शेतात मिळुन आल्या नाही त्यानंतर हिरालाल व कोरीट गावातील इतर ग्रामस्थांनी उषाबाई कोळी यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली असता रात्री १०.वाजेच्या सुमारास शांतीलाल जतन कोळी यांचे ऊसाचे शेतात कोणी तरी  अज्ञात इसमाने उषाबाई कोळी यांचे गळयावर, हातावर,मानेवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने उसाचे शेताच्या मध्यभागी फेकुन दिले होते. सदर घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन शेतात पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता उसाचे शेताच्या मध्यभागी एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत निपचीत पडलेली आढळली. तसेच त्या महिलेच्या मानेवर, गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा दिसत होत्या. याबाबत मयताचे पती हिरालाल झुलाल कोळी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् खूनाचा गून्हा नोंदविण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार यांनी गून्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ५-५ अमंलदारांचे ४ पथक तपासाठी रवाना करण्यात आले.
दि.५ जुलै रोजी, घटनेच्या दिवशी ज्या उसाच्या शेतात मयताचा मृत्युदेह मिळुन आला ते शेत, जेथे तो मृत्युदेह पडलेला होता ती चारी व मयताला शेवटच्या वेळी पाहणारा हा एकच इसम आहे, तसेच तो त्या दिवशी टोकर (बांबु) तोडत होता, या मिळालेल्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या पथकास त्या संशयीत इसमास ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्याने,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयीत रामचंद्र नागु कोळी रा. कोरीट ता.जि. नंदुरबार यास ताब्यात घेवुन विचारपुस केली, तसेच त्याला विश्वासात घेवुन त्याच्या काही विसंगत बाबी दाखविल्या असता संशयीत आरोपी रामचंद्र नागु कोळी याने मागील भांडणाचा राग मनात धरुन तसेच भांडणाचा रागातुन तिचा धारदार हत्याराने खून केल्याचे कबुल केले.
कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी रामचंद्र नागु कोळी रा. कोरीट ता.जि. नंदुरबार यास गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार, उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (गृह) देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तात्पुरते प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस उप-निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, रविंद्र पाडवी, महेंद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, जितेंद्र तांबोळी, सजन वाघ, मुकेश तावडे, विनोद जाधव, पुष्पलता जाधव पोलीस नाईक राकेश वसावे, बापु बागुल, दादाभाई मासुळ, सुनिल पाडवी, विशाल नागरे, राकेश मोरे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, गोपाल चौधरी, मनोज नाईक, जितेंद्र ठाकुर, जितेंद्र तोरवणे पोलीस अमंलदार विजय ढिवरे, किरण मोरे, अभय राजपुत, आनंदा मराठे, शोएब शेख, राजेंद्र काटके, यशोदिप ओगले, तुषार पाटील, रमेश पाडवी, रमेश साळुंके, सतिश घुले, व संपुर्ण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सर्व अमंलदारांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबासाठी ‘स्माईल’ योजनेअंतर्गत कर्ज सुविधा

Next Post

आंबापाणी येथील एकाचा दगडाने ठेचून खून, दोन संशयीत आरोपींना अटक

Next Post
आंबापाणी येथील एकाचा दगडाने ठेचून खून, दोन संशयीत आरोपींना अटक

आंबापाणी येथील एकाचा दगडाने ठेचून खून, दोन संशयीत आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add