Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबासाठी ‘स्माईल’ योजनेअंतर्गत कर्ज सुविधा

team by team
July 6, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
 राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी ‘सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड ॲण्ड एन्टरप्राईज’ (स्माईल ) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.
या योजनेतंर्गत कोविड-19 मुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली आहे अशा कुटूंबातील प्रमुख वारसदारास एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे.
एनएसएफडीसी योजनेसाठी कर्जाची रक्कम 4 लाख रुपये असेल तर एक लाख रुपये भांडवली अनुदान असून कर्जासाठी व्याज दर 6 टक्के राहील. या कर्जयोजनेसाठी मृत व्यक्तींचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोट जात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कु्टुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिंक उत्पन्न (तीन लाख रुपयांच्या आत) आदी माहिती आवश्यक राहील.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या mktprod@lidcom.co.in या ईमेलवर पाठविण्यात यावी. https://forms.gle/Q485fSUQYEuL4xUx7 या लिंकवर माहिती सादर करता येणार असून चर्मकार समाजातील कुटुंबानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यु.जे.देवकर यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

कोरीट येथे उसाच्या शेतात महिलेचा खून करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन अटक

Next Post

कोरीट येथे उसाच्या शेतात महिलेचा खून करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add