औरंगाबाद येथे आयोजित महिला सरपंच परिषदेत राज्यातील २७ हजार ग्रामसेवक संवर्गाच्या बाबतीत आमदार संजय शिरसाट यांनी अपमानास्पद उल्लेख केल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.तसेच जिल्हाभर काम बंद आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. ८ नोव्हेंबर रोजी औरंबाद येथील महिला सरपंच परिषदेत राज्यातील २७ हजार ग्रामसेवक संवर्गाच्या बाबतीत आमदार संजय शिरसाठ यांनी अपशब्द वापरून संपुर्ण संवर्गाच्या अपमान केलेला आहे.सदरचे विधान अत्यंत दुर्देवी असुन ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा जनमाणसात मलिन करणारी आहे. सदरचा विधानामुळे राज्यातील ग्रामसेवक संवर्गामध्ये त्रीव नाराजी व असंतोष निर्माण झालेला आहे.त्यासाठी
राज्यभर ग्रामसेवक संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यात देखील एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून ग्रामसेवकांनी काळया फिती लावून घटनेचा निषेध व्यक्त केला. आमदार शिरसाट यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आग्रही मागणी नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक संघटनेने केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रवींद्र वळवी, सचिव रत्नाकर शेंडे, आर.टि. पवार, पीआर कोकणी ,अनिल निकम,संतोष शिंदे नरेंद्र पटेल, व्हि.जी. सूर्यवंशी, उपेंद्र राजपूत, गणेश मोरे ,सुरज कोकणी, राजू चौधरी, अनिल पाटील, गिरीश घुगे आदीं. आदींच्या स्वाक्षर्या आहेत.