Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला नंदुरबार जिल्हा मनसेचा पाठींबा

team by team
November 10, 2021
in राज्य
0
एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला नंदुरबार जिल्हा मनसेचा पाठींबा

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे शासकीय  सेवेत विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्या संपाला नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दिला आहे. यावेळी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्‍यांना पाठींबा पत्र देवुन मनसे पदाधिकार्‍यांनी चर्चा केली.

राज्यभर एसटी कर्मचार्‍यांचे संप सुरु आहे. या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन पाठींबा देण्यात येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने नंदुरबार आगारातील एसटी कर्मचार्‍यांची भेट घेत संपाला पाठींबा देण्यात आला. एसटी महामंडळातील सर्व कर्मचार्‍यांना शासनाने शासकीय सेवेत विलीनीकरण करून घ्यावे. तसेच वर्षानुवर्ष दिवस-रात्र सेवा बजावणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना इतर सर्व राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणेच वेतन व त्या संबंधातील सर्व सोयीसुविधा शासनाने त्वरित लागू कराव्यात, या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. नंदुरबार येथील आगारातील एसटी कर्मचार्‍यांची भेट घेत नंदुरबार जिल्हा मनसेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा करुन संपाला पाठींबा दिला. यावेळी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, मनविसेचे सैनिक राम ठक्कर, खोंडामळीचे गटअध्यक्ष कल्पेश माळी आदी उपस्थित होते. संपाला पाठींबा पत्र देण्याबरोबर एसटी कर्मचार्‍यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा करुन मनसे पदाधिकार्‍यांनी विचारपूस करीत चर्चा देखील केली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा ग्रामसेवक संघटनेतर्फे काम बंद आंदोलन, संघटनेतर्फे प्रशासनाला देण्यात आले निवेदन

Next Post

आंदोलनात जि.प.प्रशासन फूट पाडण्याच्या करीत आहे प्रयत्न, बेमुदत उपोषण होणारच: महासंघाचा इशारा

Next Post

आंदोलनात जि.प.प्रशासन फूट पाडण्याच्या करीत आहे प्रयत्न, बेमुदत उपोषण होणारच: महासंघाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add