नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथील ग्रामपंचायतीतर्फे ५ टक्के दिव्यांग निधी वाट करण्यात आला.यावेळी २४ दिव्यांग बांधव यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आनंद पाटील (भालेर) यांच्या नेतृत्वाखालील नंदुरबार जिल्हा अध्यक्ष साहेबराव कोळी, जिल्हा महासचिव संगीता भोई, विलास तांबोळी, नंदुरबार तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील,शहराध्यक्ष शैलाताई यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सौ.अश्विनी किशोर पाटील, उपसरपंच गजराजसिंग महेंद्रसिंग राजपूत,सदस्य श्रावण भिल,यमुनाबाई भिल,मनिषा कोळी,दुला भिल, सुनिता भिल,दिपक भिल,मनिषा भिल यांच्या ह्स्ते २४ दिव्यांग बांधव यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले.एकुन १२ हजाराचा निधी आरटीजीएस करून देण्यात आला.