नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे घराचा हक्क मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याच्या कारणातून एकास तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पटेलवाडीत राहणारे नरगिस सैय्यद मुक्तार यांनी राहते घराचा हक्क मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. या कारणातून आमिनबी पिंजारी, खुशबू तबसुम पिंजारी व शकील पिंजारी या तिघांनी हाताबुक्यांनी मारहाण करीत नरसिग मुक्तार यांना शिवीगाळ केली. याबाबत नरसिग सैयद मुक्तार पिंजारी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल धनगर करीत आहेत.