नंदुरबार | प्रतिनिधी
बुधावली येथे फोन उचलत नसल्याच्या कारणातून जावायाने सासर्याला लाकडी डेंगार्याने मारहाण केल्याची घटनाघडली. याप्रकरणी एकाविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील बुधावली येथील सुनिल परशराम वळवी व यांनी जावाई उमेश चुनिलाल वळवी यांना मोबाईलवर फोन केला. परंतु त्यांनी फोन उचलला नसता या कारणातून वाद झाल्याने उमेश चुनिलाल वळवी याने सासरा सुनिल वळवी यांना लाकडी डेंगार्याने मारहाण करीत जखमी केले. याबाबत सुनिल परशराम वळवी यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जावाई उमेश चुनिलाल वळवी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.